Monday, July 8, 2024

अभिज्ञा भावेने बांधली साताजन्माची गाठ! मेहुलसोबत आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरूवात; पाहा लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ

चालू वर्ष २०२१ मध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार बोहल्यावर चढणार आहे. याच शुभ घटनांचा श्रीगणेशा मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेने केला आहे. नवीन वर्षाची सुरुवात अभिज्ञा भावेसाठी अतिशय सुखद ठरली आहे. कारण नुकतीच अभिज्ञाने तिच्या मित्राशी मेहुल पै सोबत विवाहबंधनात अडकली आहे.

अगदी जवळच्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा मुंबईत पार पडला आहे. या विवाहसोहळ्यात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिज्ञाच्या लग्नाची बातमी समजताच चाहत्यांनी अभिज्ञा आणि मेहुलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

गुलाबी रंगाच्या पेहरावात अभिज्ञा आणि मेहुल अतिशय सुंदर दिसत होते. २०२० च्या ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. तिच्या साखरपुड्याचे फोटो देखील खूप व्हायरल झाले होते. अभिज्ञाचे लग्नापूर्वीचे सर्व विधी तिच्या घरीच झाले होते. तिने यासर्व विधींचे फोटो सोशल मीडियावर देखील पोस्ट केले होते.

अभिज्ञा भावेचा नवरा मेहूल पै मुंबई येथील रहिवासी आहे. मागील १२ वर्षांपासून तो क्लॉकवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतो. त्याच कंपनी इव्हेंट मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट आणि फायनान्शिअल प्लॅनिंगचे काम करते.

या लग्नसोहळ्याला अभिनेता संजय मोने, अभिनेत्री मयुरी देशमुख, शर्वरी लोहकरे, ओमप्रकाश शिंदे या सारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती.

https://www.instagram.com/p/CJs6RDplTwP/?utm_source=ig_web_copy_link

अभिज्ञा सध्या रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसून येत आहे. त्या आधी तिने तुला पाहते रे, खुलता कळी खुलेना, लगोरी, प्यार की एक कहानी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिज्ञा ‘चला हवा येऊ द्या’मध्येही कॉमेडी स्किट्स करताना सुद्धा दिसली होती.

अभिज्ञा अभिनय क्षेत्रात येण्याआधी एअर हॉस्टेस होती. अभिज्ञा पाठोपाठ मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक असे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. अभिज्ञाला तिच्या नव्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

हे देखील वाचा