Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिज्ञा भावेचा पती देतोय कर्करोगाला झुंज, सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती

अभिज्ञा भावे ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून तिने यश मिळवले आहे. मागच्याच वर्षी आभिज्ञाने तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. तिने मेहुल पैसोबत लग्न केले. पण मेहुल सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. तो सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याने नुकतेच एक पोस्ट शेअर केली आहे की, पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे. त्याने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे.

मेहुलने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्यासोबत अभिज्ञा देखील दिसत आहे. दुसऱ्या एका फोटो मध्ये अभिज्ञा मेहुलच्या डोक्याला किस करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करून त्याने अत्यंत भावनिक कॅप्शन दिले आहे.
त्याने लिहिले आहे की, “मला माझ्या आयुष्यात अनेक मूर्ख लोक भेटलेत. पण कॅन्सर हा त्यापैकी सर्वात मोठा मूर्ख… माफ कर कॅन्सर, पण तू चुकीच्या व्यक्तिला निवडलं आहेस…,’

मेहुलच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत, तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे. अभिज्ञाची अतिशय जवळची मैत्रिण व अभिनेत्री मयुरी देशमुख हिने त्याच्या या पोस्टवर कमेंट करत, त्याला धीर दिला आहे. ‘तू रॉकस्टार आहेस, तुझ्यासोबत असलेल्या व्यक्तिमुळे विजय तुझाच होणार आहे,’ असं मयुरीने लिहिलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ६ जानेवारी २०२१ रोजी अभिज्ञा आणि मेहुल दोघंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी मेहुलला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून तो बरा देखील झाला होता. पण आता त्याला कॅन्सरनं गाठलं आहे. अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. अचानक हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.अभिज्ञाप्रमाणे मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती.

अभिनेत्री अभिज्ञा भावे ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचली. आता अभिज्ञा झी मराठीवरली ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत दिसणार आहे. तसेच तिने ‘पवित्र रिश्ता २.०’ मध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा