Monday, June 23, 2025
Home मराठी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिजीत एन्जॉय करतोय सोलो ट्रिप; फोटो शेअर करून घडवले लडाखचे दर्शन

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिजीत एन्जॉय करतोय सोलो ट्रिप; फोटो शेअर करून घडवले लडाखचे दर्शन

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिजीत खांडकेकर म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका गुरू. या मालिकेने अभिजीतला खूप ओळख दिली आहे. नकारात्मक भूमिका साकारून देखील त्याने प्रेक्षकांच्या मनात त्याची जागा निर्माण केली आहे. या मालिकेतील त्याचा अभिनय प्रेक्षकांना जबरदस्त आवडला होता. सध्या सोशल मीडियावर अभिजीतच्या भटकंतीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

अभिजीत सध्या लेह- लडाखमध्ये सोलो बॅकपॅक ट्रिप एन्जॉय करत आहे. लडाखमधील अनेक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तेथील निसर्गरम्य वातावरण त्याने सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना दाखवले आहे. त्याच्या या फोटोमध्ये लडाखचे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळत आहे. लेह- लडाख हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथील वातावरण वर्षभर छान असते. अनेकजण येथे त्यांच्या आयुष्यातील क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी येत असतात. येथील बर्फाळ प्रदेश, अनेक इतिहासकालीन वस्तू, दऱ्या- खोऱ्या, तसेच अनेक पदार्थ या सगळ्याचे दर्शन अभिजीतने आपल्याला त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून घडवले आहे. (abhijeet khandkekar solo trip photo viral on social media)

अभिजीतने 2010 साली झी मराठी या वहिनीवरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ का मालिकेत मृणाल दुसानिससोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. त्यांची प्रेम कहाणी खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम केले. या मालिकेने जवळपास 5 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेत त्याने अनिता दाते आणि रसिका सुनीलसोबत मुख्य पात्र निभावले होते. या मालिकेत एक लव्ह ट्रँगल दाखवला होता.

त्याने 2013 साली अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिच्याशी विवाह केला. सुखदा देखील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. सध्या ती ‘अहिल्या’ हा हिंदी मालिकेत काम करत आहे.

अभिजीतने ‘जय महाराष्ट्र’, ‘भय’, ‘मी पण सचिन’, ‘ढोल ताशे’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘ध्यानी मनी’, ‘बाबा’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या तो ‘क्रिमिनल्स: चाहूल गुन्हेगाराची’ या मालिकेत होस्ट म्हणून काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेसचा तडका! टीना दत्ताच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पांढऱ्या मोनोकनीत दिल्या हटके पोझ

-खरं की काय? दीपिका पदुकोण चक्क अंतिमसंस्कारांच्या वेळी घातलेल्या कपड्यांचे करते लिलाव?, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

-निसर्गाच्या सानिध्यात हरवलीय पूजा सावंत, फोटो शेअर करत म्हणतेय, ‘जिथे जाल तिथे…’

हे देखील वाचा