Saturday, September 21, 2024
Home मराठी निसर्गाच्या सानिध्यात हरवलीय पूजा सावंत, फोटो शेअर करत म्हणतेय, ‘जिथे जाल तिथे…’

निसर्गाच्या सानिध्यात हरवलीय पूजा सावंत, फोटो शेअर करत म्हणतेय, ‘जिथे जाल तिथे…’

मराठी सिनेसृष्टीतील मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या लुक्सने नेहमी सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते आहेत. सुंदर चेहरा आणि आकर्षक फिगर असणाऱ्या पूजाची फॅन फॉलोविंगही तगडी आहे. दररोज आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

अलीकडेच पूजा सावंत निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवताना दिसली. हे फोटो पूजाने स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात तिने ऑफ-शोल्डर पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळी जीन्स घातली आहे. सोबतच तिने डेनिम जॅकेट कंबरेला बांधलेलं दिसत आहे. या फोटोमध्ये तिच्या आजूबाजूला हिरवळ आपण पाहू शकतो. यात ती निसर्गाच्या सौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. (pooja sawant enjoy nature’s beauty in amarawati)

या फोटोंमध्ये पूजा नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिचा स्टायलिश अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतोय. त्यामुळेच यावर नेटकरी मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हे फोटो शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “तुम्ही जिथेही जाल तिथे मनापासून जा. महाराष्ट्रातील वेगवेगळे फ्लेवर शोधताना…” पूजाने हा फोटो अमरावतीमध्ये क्लीक केल्याचे दिसून येत आहे.

अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१० मध्ये आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला हिंदी चित्रपटांचीही ऑफर आली. २०१९ मध्ये आलेल्या ‘जंगली’ या चित्रपटात ती विद्युत जामवालसोबत दिसली. यात तिने नायिकेची भूमिका साकारली होती.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच

-अफगाणिस्तानातली हृदयद्रावक परिस्थिती पाहून बॉलिवूडही झाले स्तब्ध; सुनील शेट्टी ते कंगनापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

-‘तुझे बोलणे ऐकूण कानातून रक्त येते’, ट्रोलर्सची ही कमेंट पाहून अनन्या पांडेने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा