बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा आज शेवट होणार आहे. आज म्हणजे 6 ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचा ग्रँड फिनाले चालू होण्यासाठी अगदी थोड्याच वेळा बाकी आहे. पण आता यावर्षी देखील कोण विजेता होणार? ट्रॉफी कोण उचलणार याबाबत सगळ्यांच्या मनात धाकधुक चालू झालेली आहे. अशातच एक नवीन प्रमुख समोर आलेला आहे. यापूर्वीमध्ये सुरज चव्हाण आणि अभिजित सावंत यांचा एक जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होताना दिसत आहे.
कलर्स मराठीच्या ऑफिशियल इन्स्टा पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे. या प्रोमोमध्ये सुरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांचा डान्स पाहायला मिळतोय. सुरुवातीला या व्हिडिओमध्ये अभिजीत तोबा तोबा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सुरत चव्हाण स्कूटरवर एन्ट्री करतो. आणि त्याच्या झापुक झुपूक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आणि शेवटी अभिजीत आणि सूरज झापुक झुपूक स्टाईलने डान्स करताना दिसत आहे.
हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता खूप वाढलेली आहे. आता आज रात्री नक्की ग्रँड फिनाले कसा होणार आहे? यामध्ये कोणकोणते परफॉर्मन्स होणार आहे? आणि यावर्षीची ट्रॉफी कोण उचलणार आहे? हे पाहणे महत्त्वाचे आहे. हा ग्रँड फिनाले आज संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, जानवी किल्लेकर, निक्की आंबोळी आणि धनंजय पोवार हे सहा जण राहिलेले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
या हिट चित्रपटांचे सिक्वेल सपशेल आपटले बॉक्स ऑफिसवर; पहिल्या चित्रपटांची जादू यावेळी चालली नाही…
अमिताभचे तख्त हलवू शकणारा सत्तरच्या दशकात हा सुपरस्टार होता आघाडीवर; नंतर पूर्णच बदलली आयुष्याची दिशा…