Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘श्वेता तिवारी मला काठीने मारहाण करायची’, गंभीर खुलासा करत अभिनेता अभिनव कोहलीने सांगितले वादाचे कारण

‘श्वेता तिवारी मला काठीने मारहाण करायची’, गंभीर खुलासा करत अभिनेता अभिनव कोहलीने सांगितले वादाचे कारण

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिच्यापासून वेगळा झालेला पती अभिनव कोहली यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू असल्याची बातमी येत आहे. श्वेताने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती घरगुती हिंसाचाराची शिकार झाली होती आणि अभिनवने तिच्यावर हात उचलला होता. यावर आता अभिनवने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने कबूल केले की, एकदा त्याने श्वेताला चापट मारली होती. पण श्वेताने त्याला मारहाण केल्याचेही त्याने सांगितले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनवने सांगितले की, जेव्हा पहिल्या लग्नातील श्वेताची मुलगी पलक म्हणाली की, ती अभिनवसोबत राहू शकत नाही आणि तेव्हापासूनच सर्व परिस्थिती बिघडू लागली. अभिनवच्या म्हणण्यानुसार, त्याने ऑक्टोबर 2020 पासून त्याच्या मुलाला पाहिले नाही.

चापट मारल्याबद्दल मागितली आहे माफी
या मुलाखतीत अभिनव म्हणाला की, “मी श्वेताला कधीही मारहाण केली नाही. फक्त चापट मारली होती, ज्याचा उल्लेख पलकने तिच्या पत्रात केला होता. चापट मारल्याबद्दल मी त्या दोघींकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे. हे सर्व कन्फ्युजन श्वेताने निर्माण केले आहे आणि तेही केवळ मी तिच्यावर घरगुती हिंसाचार केला, हे सिद्ध करण्यासाठी, जे खरे नाही. महिलांना मारहाण करणाऱ्यांमधला मी नाही.”

डोळ्याखाली होती एक काळी खूण
अभिनव म्हणाला, “नुकत्याच एका मुलाखतीत श्वेताने पत्नीला मारणारा म्हणून माझे वर्णन केले होते. खरं तर तिने स्वत: मला काठीने मारले आहे. जेव्हा 2017 मध्ये आमचे भांडण झाले आणि ती माझ्या 3 महिन्यांच्या मुलासह माझ्यापासून वेगळी झाली, तेव्हा मी मुलाला भेटण्याचा खूप प्रयत्न केला. मी इंस्टाग्रामवर एक फोटोदेखील शेअर केला होता, ज्यात माझ्या डोळ्याखाली काळे निशान दिसू शकते. श्वेताने तिच्या मुलाखतीत सांगितले की, मलाही भडकावले होते, पण मी कोणाला मारले नाही. उलट तिनेच मला मारले होते. ही गोष्ट कोणालाही कळाली नाही, कारण मी माध्यमांकडे गेलो नाही.”

मुलाखतीत श्वेता काय म्हणाली
दिलेल्या मुलाखतीत श्वेता तिवारी म्हणाली होती की, पलकने तिला मारहाण होताना पाहिले. वयाच्या सहाव्या वर्षी तिला हे सर्व पाहावे लागले, म्हणून श्वेताने हे पाऊल उचलले होते. श्वेताच्या म्हणण्यानुसार, तिचा मुलगा 4 वर्षांचा आहे, तरी त्याला आताच पोलिस, न्यायाधीश यांची माहिती आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तूच खरा देवदूत! सलमान खानने वाचवला होता अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईचा जीव, एकाच फोनवर पोहोचला होता घरी

-भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत जोडलं गेलं अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं नाव, म्हणाली, ‘मी कोणत्याही क्रिकेटपटूला…’

-नुसता राडा! राजामौली यांच्या ‘या’ चित्रपटाने रिलीझपूर्वी केली ९०० कोटी रुपयांची कमाई, ‘बाहुबली’लाही टाकले मागे

हे देखील वाचा