Sunday, April 14, 2024

तूच खरा देवदूत! सलमान खानने वाचवला होता अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईचा जीव, एकाच फोनवर पोहोचला होता घरी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा मागील काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. दियाने फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील व्यावसायिक साहिल संघासोबत लग्नगाठ बांधली होती. यानंतर आता लग्नाच्या दीड महिन्यानंतर दियाने गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली. यामुळे तिने माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधले. याव्यतिरिक्त चित्रपटसृष्टीत दियाचे असंख्य मित्र आहेत, परंतु यातील सर्वात खास मित्र कोणी असेल, तर तो आहे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान. सन 2015 मध्ये सलमान दिया आणि तिची आईसाठी मसीहा बनला होता.

खरं तर सलमानने दियाच्या आईचा जीव वाचवला होता. याचा उल्लेख दियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून केला होता.

सलमान खान आपल्या अभिनयाव्यतिरिक्त नेहमीच गरजू व्यक्तींना मदत करताना दिसतो. दियासाठीही सलमान देवदूत बनून आला होता. खरं तर दियाची आई अचानक बेशुद्ध झाली होती, तेव्हा तिने सलमान खानला फोन करून बोलावले होते. तो दियाच्या घरी पोहोचला आणि दियाच्या आईला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यावेळी म्हटले होते की, जर तिच्या आईला रुग्णालयात दाखल होण्यासाठी 15 मिनिटे जरी उशीर झाला असता, तर आम्ही त्यांना वाचवू शकलो नसतो.

सलमानच्या या कार्यासाठी दियाने 6 मे, 2015 रोजी ट्वीट करत त्याला आपल्या अंदाजात धन्यवाद दिला होता. तिने लिहिले होते की, “हा तो व्यक्ती आहे, ज्याने माझ्या आईचा जीव वाचवला आहे. मी त्याचे उपकार कधीही विसरणार नाही.” यासोबतच तिने #SalmanKhan असा हॅशटॅगही दिला होता.

दियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा मी आईबाबत खूप चिंतेत होते, तेव्हा सलमानने माझी साथ दिली. सलमानचे हे उपकार मी कधीही विसरू शकत नाही. कोणत्याही प्रसंगात मी त्याची नेहमी साथ देईल.” विशेष म्हणजे त्यावेळी सलमान खान काळवीट शिकार प्रकरणात चर्चेत होता.

सलमान खानची मदतीसाठी पुढे येण्याची ही पहिली वेळ नाहीये. त्याने यापूर्वी कपिल शर्मा, सरोज खान, फराज खान, पूजा डडवाल यांच्या मदतीसाठी धावून आला होता. त्याने नुकतेच राखी सावंतच्या आईचीही मोठी मदत केली आहे.(when actress dia sharma revealed superstar salman khan saved her mother life which i will never forget)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, ह्रदयविकाराच्या झटक्याने मावळली प्राणज्याेत
फिनालेपूर्वी ‘या’ स्पर्धकाने घेतला शो सोडण्याचा निर्णय, कारण वाचून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा