मॉडेलिंगच्या दिवसांतील ‘तो’ फोटो शेअर करत अभिनवने काढली सिद्धार्थची आठवण; कॅप्शन वाचून तर पाणावतील तुमचेही डोळे

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रत्येकजण त्याची आठवण काढत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आहे. अशातच ‘बिग बॉस’चा स्पर्धक असलेल्या मॉडेल अभिनव शुक्लाने देखील सिद्धार्थच्या मॉडेलिंगच्या दिवसांतील एक फोटो शेअर केला आहे.

अभिनव शुक्लाने शेअर केलेला हा फोटो ‘Gladrags Model Hunt 2004’ स्पर्धेचा आहे. या स्पर्धेत सिद्धार्थ आणि अभिनव दोघांनीही सहभाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान, सर्व मॉडेल्सनी आपापला परिचय सांगताना काही ना काही खास बोलले होते. काहींनी प्रसिद्ध कोट म्हटले, तर कोणी वन लाइनर्स म्हटले. अशा परिस्थितीत, सिद्धार्थचा नंबर आल्यावर तो जे म्हणाला, ते ऐकून कोणाचेही डोळे ओले होतील. (abhinav shukla shared throwback picture of siddharth from modelling days)

View this post on Instagram

A post shared by Abhinav Shukla (@ashukla09)

या स्पर्धेचा फोटो शेअर करत अभिनव शुक्लाने सिद्धार्थने बोललेले शब्दही सांगितले आहेत. त्यावेळी सिद्धार्थने त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये म्हटले होते की, “आयुष्य असं जगा, जसं काय हा शेवटचा दिवस आहे. कारण एक दिवस तुमचे शब्द खरे ठरतील. नमस्कार, मी मुंबईमधून आलेला सिद्धार्थ शुक्ला आहे.” सिद्धार्थच्या परिचयानंतर, अभिनवने आपले दुःख व्यक्त केले आणि लिहिले की, “तू हे बरोबर नाही केलं, खूप लवकर निघून गेलास.” हा फोटो आणि त्याच्या कॅप्शनने सिद्धार्थचे चाहते खूपच भावूक झाले आहेत.

अभिनवने असेही सांगितले की, त्याचा आणि सिद्धार्थचा प्रवास या स्पर्धेपासूनच सुरू झाला. इथूनच त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये पहिले पाऊल टाकले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

Latest Post