Tuesday, March 5, 2024

अभिनयाचा वारसा असूनही अभिषेक बच्चनला करावा लागला होता चित्रपटसृष्टीत संघर्ष, वाचा त्याची कहाणी

महानायक अमिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सिनसृष्टीत यशाचे शिखर गाठले आहे. त्यामुळे बच्चन कुटूंब हे बॉलिवूडमधील दरारा असलेले घराणे मानले जाते. अमिताभ यांच्या प्रमाणेच बच्चन कुटूंबाच्या लाडक्या सुनबाई म्हणजे ऐश्वर्याही लोकप्रिय कलाकार आहे. मात्र चित्रपटात नाव कमावणाऱ्या बच्चन घराण्याचे राजपुत्र अभिषेक बच्चन यांना मात्र अभिनयात विशेष छाप पाडता आली नाही. आज जाणून घेऊ या अभिषेक बच्चन याच्याबद्दलच्या रंजक गोष्टी

अभिषेक बच्चन (abhishek bachchan) यांच्या नशीबाचा कुणालाही हेवा वाटावा अशीच त्यांच्या वडिलांची कारकिर्द आहे. महानायक अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लाडक्या पुत्राचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 ला झाला. मुलगा झाल्याने अमिताभ बच्चन यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. इतक्या मोठ्या कुटूंबात जन्म घेवूनही चित्रपटात काम मिळवण्यासाठी अभिषेक बच्चनला मोठा संघर्ष करावा लागला होता.

अमिताभ बच्चन हे चित्रपटक्षेत्राचे महानायक म्हणून ओळखले जात असले, तरी त्यांचा सुपुत्र अभिषेक बच्चनला मात्र चित्रपटात काम मिळवण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागला होता. खरतर अभिषेक बच्चनला कधीच चित्रपटात काम करायचे नव्हते. त्याचे पहिले स्वप्न एलआयसी बनण्याचे होते. मात्र नियतीच्या मनात दुसरेच होते. अभिषेक बच्चनला अभिनयात रस नसला तरी त्याच्यात अनेक कला होत्या.

तुम्हाला माहित नसेल अभिषेक बच्चन हा गाणी गाण्यात खूपच हुशार आहेत. त्याने ‘ब्लफमास्टर’ चित्रपटासाठी गाणे गायले आहे. इतकेच नव्हेतर ‘डॉन’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या डान्सचे श्रेयही अभिषेक बच्चनलाच जाते. त्याच्या ‘खाइके पान बनारसवाला’ गाण्यासाठी अभिषेक बच्चन यांनीच डान्स सुचवला होता. अभिषेक बच्चनने चित्रपट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. त्याने पहिल्यांदा 2000 मध्ये ‘रिफ्युजी’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूरने काम केले होते.

एका मुलाखतीत बोलताना अभिषेक बच्चनने सांगितले की, “काही जणांना असे वाटते की, मला सहज चित्रपटात काम मिळाले असेल .मलाही चित्रपटात काम मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. मला पहिला चित्रपट मिळविण्यासाठी तब्बल 2 वर्ष वाट पाहावी लागली आहे. मी सुद्धा अनेक दिग्दर्शकांना भेटायचो मात्र माझ्यासोबत काम करायला कोणीही तयार होत नव्हते.” दरम्यान अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये ऐश्वर्या रॉयसोबत लग्न केले. या शाही विवाह सोहळ्याची त्या काळात मोठी चर्चा रंगली होती. (abhishek bachchan birthday special know the actors real life)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉसची ही स्पर्धक दुसर्यांदा अडकणार लग्न बंधनात; मोठ्या बिझनेसमन बरोबर थाटणार संसार

साउथच्या प्रसिद्ध अभिनेत्याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक; वाचा सविस्तर

हे देखील वाचा