Thursday, July 18, 2024

अभिषेक बच्चनने मुंबईतील बोरिवलीमध्ये खरेदी केले 6 लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे कोटींमध्ये

बॉलिवूड स्टार्स अनेकदा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात आणि जमीन किंवा फ्लॅट खरेदी करतात. आता या यादीत अभिषेक बच्चनही (Abhishek Bachchan) सामील झाला आहे. अभिषेक बच्चनने मुंबईतील बोरिवली परिसरात सहा लक्झरी अपार्टमेंट्स खरेदी केल्याची माहिती आहे. या फ्लॅटची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने ओबेरॉय रियल्टीने ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये 6 अपार्टमेंट खरेदी केले आहेत. हे सहा अपार्टमेंट एकूण 4 हजार 894 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले असून त्यांची प्रति स्क्वेअर फूट 31 हजार 498 रुपये दराने विक्री करण्यात आली आहे. 5 मे 2024 रोजी विक्री करारावर स्वाक्षरी झाली. अभिषेक बच्चनने खरेदी केलेले सहा अपार्टमेंट्स बोरिवली पूर्व येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) बाजूला असलेल्या हाय राइज बिल्डिंगच्या 57 व्या मजल्यावर आहेत आणि 10 कार पार्किंगसह येतात.

अभिषेक बच्चनने खरेदी केलेल्या सहा अपार्टमेंटपैकी दोन 252 स्क्वेअर फूट आहेत, दोन अंदाजे 1,100 स्क्वेअर फूट (कार्पेट) एरियामध्ये वितरित केले आहेत आणि उर्वरित दोन 1094 चौरस फूट आहेत. अभिषेक बच्चनने ज्या इमारतीत सहा युनिट्स खरेदी केल्या आहेत, त्या इमारतीसाठीही ऑक्युपेशन सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, बॉलिवूड मेगास्टार आणि अभिषेक बच्चन यांचे वडील अमिताभ बच्चन यांनीही अलिबागमध्ये 10 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली होती. बिग बींनी जानेवारीच्या सुरुवातीला अयोध्येत जमिनीच्या एका पार्सलमध्ये गुंतवणूक केली होती. त्यांनी द हाउस ऑफ अभिनंदन लोढा (HoABL) कडून 10,000 चौरस फूट जमीन खरेदी केली होती. ही जमीन अलिबाग नावाच्या प्रकल्पात खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच शुजित सरकारच्या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित असणार आहे. हाऊसफुल 5 या कॉमेडी ड्रामामध्ये अभिषेक बच्चनही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सुनील शेट्टीने वडिलांच्या यशाची कहाणी सांगितली; म्हणाला, ‘कधी कधी तांदळाच्या पोत्यावर झोपून दिवस काढलेत..’
सोनाक्षी सिन्हाने लग्नापूर्वी केली बॅचलर पार्टी; मैत्रिणी आणि झहीरसोबत केली मस्ती

हे देखील वाचा