Thursday, September 5, 2024
Home बॉलीवूड घटस्फोटाच्या चर्चेत अभिषेक बच्चन केलेले कृत्य चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

घटस्फोटाच्या चर्चेत अभिषेक बच्चन केलेले कृत्य चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा काही दिवसापासून सर्वत्र होत आहे. यातच अभिषेक बच्चनने असे काही केले आहे की या चर्चांना जोर आला आहे. अभिनेता अभिषेक बच्चन आणि विश्वसुंदरी २००७ साली यांनी लग्न केलं. पण आता त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण येत आहे. यावर अजूनही बच्चन कुटूंबीयांनी काहीही प्रतिक्रीया दिलेली नाही. पण सोशल मिडीयावर या विषयावर खूप चर्चा होत आहेत.

झालं असं की सोशल मीडिया प्लेटफॉर्म इंस्टाग्रामवर हीना खंडेलवाल नावाच्या यूजरने एक घटस्फोटासंबंधी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने घटस्फोटाची वाढण्याची कारणे आणि त्याच्यामूळे ज्या समस्यांनासामोरो जावे लागते या संबंधी चर्चा करणारी ही पोस्ट होती. आणि या पोस्टला अभिषेक बच्चन याने लाइक केलं होत. यानंतर ही पोस्ट सोशल मिडीयीवर खूप वायरल झाली. याबाबत अभिषेक बच्चनच्या चालू असलेल्या आयुष्यावर खूप चर्चा होत आहेत. आता अभिषेक बच्चनने या पोस्टवर केलेले लाइक हटवले आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंडच्या लग्नसोहळ्यात ऐश्वर्या ही आपली मूलगी आराध्यासोबत लग्नात एकटीच पोहचली होती. आणि अभिषेक बच्चन त्याच्या पूर्ण परीवारासोबत लग्नाच्या ठिकाणी पोहचला. पण तो पूर्ण कार्यक्रम आपली बायको ऐश्वर्या आणि मूलगी आराध्यासोबत बसला होता. तिघेही या कार्यक्रमातसोबत दिसले.

वायरल झालेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, “जेव्हा प्रेम करणं सोप राहत नाही.’ याच्या कॅप्शन घटस्फोट कोणासाठीही सोपा नसतो .कोण जगताना आनंदी राहण्याचे स्वप्न बघत नाही. कधी कधी जीवन तसं नसत जसा आपण विचार करतो.या पोस्टला अभिषेक बच्चन याने लाइक केलं होत पण त्याने आता ते लाइक हटवला आहे.:

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘बिग बॉस मराठी’ची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी नव्या सीझनमध्ये रितेशचा कल्ला सुरू होणार
अनंत आणि राधिका अडकले लग्न बंधनात; लग्नातील पहिला फोटो आला समोर

 

हे देखील वाचा