Friday, February 3, 2023

Dasvi | ‘मचा मचा रे’ गाणं रसिकांच्या भेटीला, मिशीवर ताव मारताना दिसला अभिषेक बच्चन

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) त्याच्या आगामी ‘दसवी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, ‘मचा मचा रे’ असे या गाण्याचे बोल आहेत. अभिषेक बच्चनचे हे गाणे एक धमाल विनोदी गाणे असल्याचे दिसत आहे. यामध्ये तो आपल्या खास शैलीत मिशीवर ताव मारताना दिसत आहे. सध्या त्याच्या या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या गाण्यावर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

अभिषेक बच्चन हा हिंदी चित्रपट जगतातील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या अभिनयाने अभिषेकने चित्रपट जगतात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र गेली अनेक महिने अभिषेकचा कोणताच नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. आता त्याच्या ‘दसवी’ चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

या चित्रपटातील ‘मचा मचा रे’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. जे सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. ‘दसवी’ हा एका भ्रष्ट, अडाणी लोकनेत्यावर आधारित चित्रपट आहे. जो एका गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये जातो आणि तिथे तो एका जादूची निर्मिती करतो. चित्रपटाच्या कथेप्रमाणेच हे गाणेही प्रचंड विनोदी वाटत आहे. या गाण्याला सचिन- जिगर यांनी संगीत दिले आहे, तर अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणे गायले आहे. गाण्याला मिका सिंग, दिव्या कुमार, सचिन- जिगर यांचा आवाज लाभला आहे.

दरम्यान, अभिषेक बच्चनच्या या आगामी दसवीं चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केले आहे. चित्रपटात अभिषेक बच्चन, यामी गौतम, निम्रत कौर यांंनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट ७ एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याआधी अभिषेक बच्चनचा ‘बिग बुल’ चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. यामधील अभिषेक बच्चनच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा