पन्नाशी उलटली तरी अबाधित आहे हेमा मालिनींच्या सौंदर्याची जादू आहे, ‘या’ कार्यक्रमात केले सलग दोन तास नृत्य

हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या सध्या चित्रपटात जास्त दिसत नसल्या तरी त्यांच्या अभिनयाची चर्चा नेहमीच होत असते. यामध्ये दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ड्रिम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) या हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने त्यांनी हिंदी चित्रपट जगतात वेगळी ओळख निर्माण केली होती. ९०च्या दशकात हेमा मालिनी यांच्या सौंदर्यावर प्रत्येक अभिनेता फिदा होता. त्यांच्या दमदार अभिनयाची चर्चा तर होतेच, त्याचप्रमाणे त्यांच्या डान्सचेही असंख्य चाहते पाहायला मिळतात. आज त्या चित्रपटात दिसत नसल्या, तरी त्यांचा उत्साह मात्र अजिबात कमी झालेला नाही. ७३ वर्षीय हेमा मालिनी आजही तितक्याच कुशलपणे नृत्य करताना दिसतात. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हेमा मालिनी सलग दोन तास डान्स केल्याची माहिती शेअर केली आहे. 

हेमा मालिनी यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या राधाच्या पेहरावात नृत्य करताना दिसत आहेत. याबद्दल त्यांनी सांगितले की, नागपूरमध्ये झालेल्या राधा रास बिहारी यांच्या मेळ्यात सलग दोन तास नृत्य केले. या फोटोत निळी चोळी आणि लाल लेहंगा घातलेल्या हेमा मालिनी खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांनी गळ्यात हार आणि डोक्यावर मुकूट घेतलेलाही दिसत आहे. हा फोटो शेअर करत हेमा मालिनी यांनी, “नागपूरमध्ये रास बिहारी यांच्या मेळ्यात नृत्य करुन खूप आनंद झाला. खासदार संस्कृती महोत्सवानिमित्त नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मी सलग दोन तास नृत्य करत होते आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला” अशा शब्दात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Dream Girl Hema Malini (@dreamgirlhemamalini)

दरम्यान हेमा मालिनी यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी एका चाहत्याने “मी त्याठिकाणीच होतो” असे म्हणले आहे. तर आणखी एकाने “तुमच्या नृत्यात जादू आहे” अशा शब्दात त्यांचे कौतुक केले आहे. याआधीही अनेक कार्यक्रमात हेमा मालिनी यांच्या नृत्याची जादू त्यांच्या चाहत्यांना अनुभवायला मिळाली आहे. सध्या हेमा मालिनी भाजपा खासदार म्हणून काम करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post