Monday, June 24, 2024

अभिषेक बच्चन शेअर केले त्यांच्या मालदीव ट्रिपचे फोटो, ऐश्वर्याच्या फोटोला म्हटले सर्वात सुंदर

नुकताच बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसासाठी अभिषेक त्याची पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मालदीवमध्ये ते एका द्वीप रिसॉर्टमध्ये थांबले होते. आता ते पुन्हा मुंबईत परतले असून, अभिषेकने त्याच्या या सुट्ट्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यातला ऐश्वर्याचा फोटो चांगलाच गाजत आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

अभिषेकने त्याच्या ट्रिपचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “काही सुंदर नजारे, खासकरून शेवटचा. माझ्या वाढदिवसाला खास बनवण्यासाठी स्ट्रेजेस मालदीवचे खूप खूप आभार.” अभिषेकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मालदीवचे काही अतिशय सुंदर आणि आकर्षक फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्याने शेवटचा एक फोटो ऐश्वर्याचा पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर शांत भाव दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

अभिषेक बच्चनने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये मालदीवमध्ये हॉटेलमध्ये त्याचे ऐश्वर्या आणि आराध्याचे स्वागत कसे करण्यात आले त्याचे देखील फोटो आहेत. यामध्ये त्यांचे नाव लहान पानांनी आणि फुलांनी अतिशय कलात्मक पद्धतीने लिहिले होते. यासोबतच त्यांच्या रूमच्या बेडवर हॅप्पी बर्थडे लिहिले होते. या सोबतच त्याने काही समुद्राचे, सनसेटचे अतिशय सुंदर फोटो पोस्ट केले आहे.

अभिषेक बच्चनच्या या फोटोंवर नेटकऱ्यांसोबतच बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील कमेंट्स करत फोटोंचे कौतुक केले आहेत. अनेकांनी अभिषेक बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर काहींनी ऐश्वर्या रायचा फोटो सर्वात सुंदर असल्याचे देखील सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अजून किती वाट पाहायची! पुन्हा एकदा समंथाच्या ‘शाकुंतलम’ सिनेमाचे प्रदर्शन गेले पुढे

भोजपुरी अभिनेत्री असलेल्या माही श्रीवास्तवच्या ‘ननद अब हद कइली’ गाण्याने घातला धुमाकूळ

हे देखील वाचा