Tuesday, June 18, 2024

अजून किती वाट पाहायची! पुन्हा एकदा समंथाच्या ‘शाकुंतलम’ सिनेमाचे प्रदर्शन गेले पुढे

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समंथा. एका पेक्षा एक सरस चित्रपट देणारी समंथा दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच सामंथाने तिच्या आजारपणाबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर तिच्याबद्दल फॅन्सच्या मनात खूपच निराशा निर्माण झाली होती. त्यानंतर तिने सोशल मीडियावर तिच्या आगामी ‘शाकुंतलम’ सिनेमाचे काही फोटो पोस्ट केले. हे पाहून तिचे फॅन्स या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र आता या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये बदल झाला आहे.

शाकुंतलम सिनेमाच्या निर्मात्यांनी आता जाहीर केले आहे की, हा सिनेमा येत्या १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार नाही. सिनेमाची नवीन प्रदर्शनाची तारीख लवकरच घोषित केली जाणार आहे. हा सिनेमा मुख्यत्वे तेलगूमध्ये प्रदर्शित होणार असला तरी पॅन इंडिया असणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या गुणशेखर यांनी सांगितले की, “आम्हाला आपल्याला सांगण्यात वाईट वाटते की, शाकुंतलम हा सिनेमा येत्या १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार नाही. नवीन प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

या सिनेमाच्या बाबतीत दुसऱ्यांदा असे झाले आहे की, सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलावी लागली. हा सिनेमा आधी ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मग तारीख बदलून १७ फेब्रुवारी झाली, आता ती देखील बदलली गेली आहे. या सिनेमाची कथा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पौराणींक कथेवरून प्रेरित आहे. महाकवी कालिदास यांच्या संस्कृत नाटक असणाऱ्या ‘शाकुंतलम’वरून कथा घेतली आहे.

या सिनेमात समंथासोबत देव मोहन के अलावा अल्लू अरहा, सचिन खेड़ेकर, कबीर बेदी, डॉ. मोहन बाबू, प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, अदिति बालन, अनन्या नागल्ला, जिशु सेनगुप्ता आदी कलाकार असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अय्याे! अर्जुन कपूरने चक्क व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीला म्हटलं, ‘झुटी और मक्कार’
रितेश-जिनेलियाच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, आठवणींना उजाळा देत शेअर केला लग्नाचा व्हिडिओ

हे देखील वाचा