अभिनेता अभिषेक बॅनर्जीने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड जगतात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.अभिषेकने त्याच्या करिअरची सुरुवात कास्टिंग मॅन म्हणून केली होती.अभिषेक आर्थिक अडचणींमुळे कास्टिंगच्या क्षेत्रात आला होता.स्वतःला कास्ट केल्याबद्दल त्याच्यावर बरीच टीकाही झाली होती, कारण लोकांना वाटायचे की त्याच्या यशाचे कारण हेच आहे की त्याने बहुतेक प्रोजेक्ट्समध्ये स्वतःला कास्ट केले आहे.
अभिषेक म्हणाला, ‘मला नेहमीच वाटायचे की लोक मला काम देतील, मी कास्टिंगसाठी आठ वर्षे दिली. मी समजून चुकलो की मला कोणीही अभिनेता बनण्याची संधी देणार नाहीये.मला कोणीही मी कास्टिंग मॅन आहे म्हणून बोलवत नव्हतं, जर मी इतर कोणत्याही कास्टिंग डायरेक्टरला माझे ऑडिशन द्यायला सांगितलं तर तो ते कधीच करत नसे.
अभिषेकने नऊ हजार रुपये घेऊन एका प्रोडक्शन हाऊसमधून आपला प्रवास सुरू केला होता. अजय देवगण आणि इमरान हाश्मी अभिनीत ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. अभिषेक म्हणाला, ‘जोपर्यंत तुम्हाला प्रसिद्धी मिळत नाही, तोपर्यंत सर्व काही ठीक आहे. ज्या दिवशी तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आलात तेव्हा लोक तुम्हाला नावे ठेवू लागतात. ‘यार हा अभिषेक तर कास्टिंगमध्ये होता, तो पाताल लोकमध्ये स्वतःला कसा कास्ट करतोय?’
मला आठवते कोविड दरम्यान, पाताल लोक तीन दिवसात व्हायरल झालं, कारण लोकांना OTT माध्यमे माहिती झाली होती. मला त्यावेळी आनंद आणि अभिमान वाटत होता, पण दुसऱ्याच दिवशी असे लेख आले की, काही सोबतचे कलाकार माझ्या विरोधात गेले आहेत आणि ते म्हणत आहेत की ‘त्याने स्वतःला कास्ट केले’, आणि ते सोशल मीडियावर एका मोहिमेसारखे पसरले. त्यावेळी मला काहीच समजले नाही.
अभिषेकला त्याच्या ‘वेदा’ चित्रपटासाठी देखील अशाच प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे, कारण लोकांना वाटते आहे की त्याने स्वतःला चित्रपटात कास्ट केले आहे. अभिषेकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो जॉन अब्राहमच्या ‘वेदा’ आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ मध्ये सध्या दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –