Friday, September 20, 2024
Home मराठी मी सिंगल आहे ! सई ताम्हणकरच्या इन्स्टा स्टोरी वरून गदारोळ…

मी सिंगल आहे ! सई ताम्हणकरच्या इन्स्टा स्टोरी वरून गदारोळ…

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. मराठी सह ती हिंदीतही अभिनय करते आहे. तिची चित्रपट कारकीर्द गेल्या काही वर्षांत चांगली स्थिरावली आहे. सई तिच्या सोशल मिडीयावर कायम सक्रीय असते. तिच्या नवनवीन पोस्टसह ती चाहत्यांना सरप्राईज देत असते. मात्र आता तिच्या एका नवीन पोस्ट मुळे चाहत्यांना खरंच एक सरप्राईज मिळालं आहे. 

इतके दिवस सई अनिश जोग याला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. दोघांनीही सुट्ट्यांचे त्यांचे फोटोज सोशल मिडीयावर टाकले होते. अनिशच्या काही फोटोंवर सईने कमेंट्स देखील केल्या होत्या. पण सईच्या एका नव्या पोस्ट मुळे वेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत. सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात असं लिहिलंय की, मी माझ्या मर्जीने सिंगल आहे. हि माझी निवड नाहीये पण हीच माझी मर्जी आहे. 

सईने २०१३ साली अमेय गोसावी याच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र दोनच वर्षांत ते वेगळे झाले. २०१५ साली त्यांचा घटस्फोट झाला होता. मागी काही काळापासून ती अनिश जोगला डेट करत होती आणि तिने तशी कबूली देखील दिली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सईने त्याच्यासाठी एकही पोस्ट केलेली नाही. आता सईच्या या स्टोरी मुळे अजूनच शंका उपस्थित होत आहेत.       

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

राम गोपाल वर्मा रणदीप हुड्डाला दरमहा द्यायचे 35 हजार रुपये; 2024 मध्ये असा झाला दिग्दर्शक

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा