Thursday, December 19, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तारे जमीन पर’ फेम अभिनेत्याचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘आमिरकडून काम मागायला लाज वाटते’

सन २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘तारे जमीन पर’ या सिनेमाने प्रत्येकाच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. या सिनेमात आमिर खान याच्यासोबतच आणखी एकाने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली होती. तो अभिनेता म्हणजेच दर्शील सफारी होय. दर्शील तब्बल १० वर्षांनंतर आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. मागील काही काळ तो ऑनलाईन व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये दिसला होता. आता तो प्रौढ म्हणून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

‘शॉर्टकट घेणं मला आवडत नाही’
माध्यमांशी बोलताना दर्शील सफारी (Darsheel Safary) याने जुन्या-नवीन सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. विशेष म्हणजे, त्याने आमिर खान (Aamir Khan) याच्याबद्दलही मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला की, त्याला आमिरकडून काम मागताना लाज वाटते. दर्शीलने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात आमिरसोबतच केली होती. त्याला हवं असतं, तर तो त्याला मदत मागू शकला असता. मात्र, तो म्हणतो की, त्याला कोणताही शॉर्टकट घ्यायला आवडत नाही.

“मला वाटते की, हे सर्व करणे कोणताही शॉर्टकट घेण्यासारखं आहे. मला त्यांच्याकडून (आमिर खान) काम मागण्यास खूपच लाज वाटेल. मला नेहमीपासूनच वाटते की, तुम्ही जे काही करत आहात, ते तुम्ही स्वत: कमावले पाहिजे. असे नाही की, मला कोणताही लाँग कट घ्यायचा आहे, पण कमीत कमी एक शिकण्याची कट तर मिळालाच पाहिजे. मला वाटते की, मी दबाव बनवला नाही पाहिजे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Darsheel Safary (@dsafary)

मानसिक आरोग्यावर आधारित आहे आगामी सिनेमा
बालकलाकार म्हणून दर्शील सफारी याचा पहिला सिनेमा मानसिक आरोग्यावर होता. आता त्याचा आगामी सिनेमाही मानसिक आरोग्यावर आधारित आहे. यापूर्वी दर्शील ‘मिडनाईट चिल्ड्रन’ या सेलिब्रिटी डान्स शोमध्येही दिसला आहे. मात्र, २०१२मध्ये आलेल्या या शोला तितका प्रतिसाद मिळाला नव्हता. आता दर्शीलच्या आगामी सिनेमाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
बॉयफ्रेंड असावा तर असा! तेजस्वीने डोकं फोडून घेतल्यानंतर करणने ‘अशी’ घेतली काळजी, व्हिडिओ व्हायरल
दिशाचा ‘हा’ व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफही होईल फिदा, तुम्हीही पाहा अभिनेत्रीचा सिझलिंग अंदाज
आख्ख्या जगाने काढलेली आठवण एकीकडे अन् पोटच्या लेकीने काढलेली आठवण दुसरीकडे, जान्हवीची भावूक पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा