दिशाचा ‘हा’ व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफही होईल फिदा, तुम्हीही पाहा अभिनेत्रीचा सिझलिंग अंदाज

बॉलिवूडमध्ये मोजक्याच सिनेमात काम केलेल्या, पण अफाट लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्रींमध्ये दिशा पटानी हिचा समावेश होतो. दिशाने आतापर्यंत जवळपास ९-१० सिनेमात काम केले आहे. तिच्या खात्यात आणखी ३ सिनेमे आहेत. मात्र, ते आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. एवढ्या कमी, पण हिट सिनेमात काम करूनही दिशा आज बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणली जाते. दिशा सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असते. दिशाला इंस्टाग्रामवर ५ कोटींहून अधिक चाहते फॉलो करतात. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते पसंती दर्शवतात. आताही तिचा एक किलर लूकमधील व्हायरल होतोय, ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिचा बेधुंद करणारा अंदाज पाहायला मिळत आहे. या व्हिडिओतील तिचा लूक एकदम किलर वाटत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते प्रेम व्यक्त करत आहेत. एका दिवसाच्या आत या व्हिडिओवर ४ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच आतापर्यंत २३ लाख चाहत्यांना हा व्हिडिओ पाहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

या व्हिडिओत दिशा ‘लागी तुमसे मन की लगन’ या गाण्यावर तिच्या अदा फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सरळ ड्रेस आणि एक दोरी असणाऱ्या शॉर्ट टॉपमध्ये दिशा एकदम सुंदर दिसत आहे. तिला पाहून असे दिसते की, तिचा हा व्हिडिओ एका फोटोशूटचा भाग आहे. यामध्ये ती वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.

चाहत्यांनाही आवडला व्हिडिओ
दिशाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “शानदार.” यासोबतच तिने लाल रंगाचा इमोजीही शेअर केला आहे. या व्हिडिओत दिशाचा बेधुंद करणारा अंदाज पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. कदाचित तिचा हा व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफही फिदा होईल. एकाने तिच्या या व्हिडिओवर ‘स्टनिंग’, तर दुसऱ्याने ‘अति सुंदर’ अशी कमेंट केली आहे. याव्यतिरिक्त आणखी एका चाहत्याने म्हटले की, “दिशा, माझं तुझ्यावर प्रेम आहे.”

‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये पाहायला मिळाला किलर लूक
दिशाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या सिनेमात झळकली होती. हा सिनेमा २९ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात दिशाव्यतिरिक्त जॉन अब्राहम, तारा सुतारिया, अर्जुन कपूर हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या
आख्ख्या जगाने काढलेली आठवण एकीकडे अन् पोटच्या लेकीने काढलेली आठवण दुसरीकडे, जान्हवीची भावूक पोस्ट व्हायरल
भयंकर! 15 वेळा हॉरर चित्रपट पाहिल्यानंतर स्वतःलाच समजू लागला भूत, पेटवून घेत केली आत्महत्या
‘यामुळे’ कॅटरिना, दीपिकावर संतापला करण जोहर, असा घेणार बदला

Latest Post