एखादा अभिनेता त्याच्या सिनेमासाठी कसून मेहनत घेत असतो. मात्र, तरीही त्याच्या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत नसते, त्यामुळे सिनेमा रुपेरी पडद्यावर चालत नाही. या सिनेमासाठी निर्माते, दिग्दर्शक, इतर कलाकार या सर्वांनी त्यांचा वेळ, त्यांची मेहनत खर्च केलेली असते. अशात सिनेमा जेव्हा फ्लॉप ठरतो, तेव्हा त्यांच्या मनाला काय वाटत असेल, हे त्यांनाच ठाऊक. असेच काहीसे आता कदाचित ‘लाल सिंग चड्ढा‘ या सिनेमाच्या संपूर्ण टीमला आणि मुख्य अभिनेता आमिर खान याला वाटत असावे. आमिरच्या या सिनेमाचे कलाकारांनी कौतुक केले, पण बॉयकॉट ट्रेंडमुळे सिनेमाला यश आले नाही. अशात आमिरबद्दल मोठी बातमी समोर येत आहे.
अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा मोठ्या काळासाठी ब्रेक घेत असल्याची बातमी आहे. तो जवळपास २ महिन्यांसाठी भारत सोडून अमेरिकेला जात आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा सिनेमा २०२२ मधील मोठ्या सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. दीर्घ काळानंतर आमिर रुपेरी पडद्यावर झळकणार होता. त्याला पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. रक्षाबंधनाच्या खास दिवशी प्रदर्शित झालेल्या सिनेमाबद्दल अपेक्षा व्यक्त केली जात होती की, सण आणि स्वातंत्र्यदिनावेळी मिळालेल्या सुट्टीमुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात येतील, पण असे काहीच झाले नाही.
आमिर खानला घ्यायचाय ब्रेक
‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाने पहिल्या वीकेंडला जवळपास ४५.८३ कोटींची कमाई केली. तब्बल १८० कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या सिनेमाला मोठे नुकसान सहन करावे लागले. माध्यमांतील वृत्तांनुसार, आमिर खान दोन महिन्यांसाठी अमेरिकेला जाणार आहे. असे म्हटले जात आहे की, तो मागील ३ वर्षांपासून अद्वैत चंदन यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या आगामी सिनेमामध्ये पूर्णपणे सहभागी आहे. अशात त्याला पुढील प्रोजेक्टमध्ये काम करण्यापूर्वी काही काळ आराम करायचा आहे.
आराम करण्याच्या मूडमध्ये आमिर खान
असे म्हटले जात आहे की, ‘लाल सिंग चड्ढा’च्या कामगिरीमुळे आमिर खान निराश आहे. त्यामुळे त्याला दीर्घ काळानंतर पुढील काही आठवड्यांसाठी विश्रांती घ्यायची आहे. असे म्हटले जात आहे की, आमिर खान सुट्ट्या संपवून पुढील सिनेमाच्या तयारीला लागणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘कधीपर्यंत सहन करायचा अत्याचार?’, बिहारी विद्यार्थ्याच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच खेसारी लालची सटकली
क्या बात है! घटस्फोटानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले धनुष आणि ऐश्वर्या, खूपच खास आहे कारण
जान्हवीच्या मागे धावला बॉयफ्रेंड, तरीही थांबली नाही अभिनेत्री; नेमकं झालंय तरी काय?