Friday, March 31, 2023

‘लाल सिंग चड्ढा’च्या बॉयकॉटवर स्पष्टच बोलला विजय; म्हणाला, ‘फक्त आमिरच नाही, तर हजारो कुटुंब…’

‘लायगर’ हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत दिवस राहिले आहेत. या मुख्य अभिनेता विजय देवरकोंडा या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तुफान व्यस्त आहे. अशातच सध्या बॉलिवूड सिनेमांना बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. यावर अनेक दाक्षिणात्य कलाकारांनीही आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशात विजयनेही यावर त्याचे मत व्यक्त केले आहेत.

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमाला सोशल मीडियावर बॉयकॉट (Laal Singh Chaddha Boycott) याचा सामना करावा लागत आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही खराब प्रदर्शन केले आहे. नुकतेच विजयने याविषयी त्याचे मत व्यक्त केले आहेत. त्याला विचारण्यात आले की, बॉयकॉटच्या चर्चांवर तू काय विचार करतो?

यावर विजय म्हणाला की, “मी फक्त सिनेमा सेटवर विचार करतो. अभिनेता, दिग्दर्शक व्यतिरिक्त इतर अभिनेत्री आणि अनेक महत्त्वपूर्ण पात्र आहेत. एका सिनेमावर २००-३०० अभिनेता काम करत आहेत आणि आम्ही सर्व स्टाफ सदस्य आहोत. त्यामुळे एक सिनेमा अनेक लोकांना रोजगार देतो आणि अनेक लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही सिनेमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेता, तेव्हा तुमचा फक्त आमिर खानवर परिणाम होत नसतो, तर हजारो कुटुंबावर परिणाम होत असतो. त्यांचे उपजीविकेचे साधन हिरावले जात असते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

“आमिर सर असे व्यक्ती आहेत, जे चित्रपटगृहापर्यंत गर्दी ओढून आणतात. मला विश्वास बसत नाही की, हा बहिष्कार का टाकला जात आहे, परंतु जो गैरसमज होत आहे, कृपया त्याची जाणीव असूद्या की, तुम्ही आमिर खानवर नाही, तर अर्थव्यवस्थेवर परिणामकारक ठरत आहात. हे खूप मोठे आहे.”

‘लायगर’ सिनेमात नेमकं काय आहे?
‘लायगर’ ही एक दलित व्यक्तीची कहाणी आहे. विजयने असेही सांगितले की, तोसुद्धा हे पाहण्यासाठी खूप उत्साही आहे की, प्रेक्षक सिनेमाला किती प्रतिसाद देतात. या सिनेमात अनन्या पांडे, राम्या कृष्णन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. यासोबतच माईक टायसन हेदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. ‘लायगर’ या सिनेमाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. ‘लायगर’ हा सिनेमा २५ ऑगस्ट, २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायच्या २७ दिवसांपूर्वीच राजूने केला होता यमराज आणि मृत्यूचा उल्लेख, व्हिडिओ व्हायरल
लाईव्ह सुरू असतानाच आलियाच्या बेबी बंपवर रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, चाहते संतापले
लग्नानंतर दोनवेळा काजोलचं झालंय मिसकॅरेज, मग अजय देवगनने केले होते ‘असे’ काही

हे देखील वाचा