Saturday, June 29, 2024

आमिरला अंघोळ करायला आवडत नाही, तर करीना चावते नखे, जाणून घ्या बॉलिवूड कलाकारांच्या विचित्र सवयी

जगात विचित्र प्रकारचे लोक आहेत, जे अनेक विचित्र गोष्टी करतात. ज्या कृती इतरांना विचित्र वाटत असल्या, तरीही त्या त्या व्यक्तींना त्या गोष्टी पूर्णपणे सामान्य वाटतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, केवळ सामान्य लोकच नाही, तर बॉलीवूड कलाकार देखील अशा काही विचित्र गोष्टी करतात. या कलाकारांच्या काही विचित्र सवयी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बॉलिवूड कलाकारांबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चला तर मग जाणून घेऊया या कलाकारांच्या विचित्र सवयींबद्दल.

कलाकार काय खातात, काय घालतात, कोणाला भेटतात आणि कोणाशी त्यांचे अफेअर सुरू आहे. इतकंच नाही, तर त्यांच्या काही गोष्टी अशा आहेत, ज्या चाहत्यांना खूप विचित्र वाटतात. चला तर मग आज आपण अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊ, ज्यांच्या विचित्र कृत्यांमुळे तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

‘हे’ कलाकार करतात विचित्र गोष्टी
करीना कपूर खान
तुम्हाला नखे ​​चावण्याची सवय असेल, तर जाणून घ्या तुमची ही वाईट सवय करीना कपूर खानसारखीच आहे. ‘बेबो’ करीना कपूर खानही अनेकदा नखे चावत असते. ती अनेकवेळा दाताने नखे चावताना दिसली आहे.

आमिर खान
बर्‍याच लोकांसाठी दररोज अंघोळ करणे हे एक मोठे काम आहे. जर तुम्हालाही अशी सवय असेल, तर ती आमिर खानसारखीच आहे. आमिर खानला रोज अंघोळ करायला आवडत नाही. आमिरची पहिली पत्नी किरण राव हिने सांगितले होते की, आमिरला स्वच्छता फारशी आवडत नाही, त्याला अधूनमधून अंघोळ करायला आवडते.

प्रीती झिंटा
बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटा स्वच्छतेची खूप काळजी घेते. तिला नेहमी स्वच्छ बाथरूम हवे असते, त्यामुळे ती अनेकदा बाथरूम साफ करत असते. हे तिच्या आवडत्या कामांपैकी एक आहे.

सनी लिओनी
बॉलिवूडची ‘लैला गर्ल’ सनी लिओनीलाही एक विचित्र सवय आहे. सनी लिओनीला दर १५-२० मिनिटांनी पाय स्वच्छ करण्याची सवय आहे. सनीला तिच्या पायाची काळजी घ्यायला आवडते आणि ती वेळोवेळी पाय स्वच्छ करते.

जॉन अब्राहम
हँडसम हंक जॉन अब्राहमला पाय हलवण्याची सवय आहे. अशी सवय अनेकांना असते आणि जॉन या बाबतीत अगदी तसाच आहे.

तो जिथे बसतो, तिथे पाय हलवत राहतो. चॅट शो आणि पत्रकार परिषदेमध्येही तो अनेकदा पाय हलवताना दिसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा