“ही माझी शेवटची पोस्ट…” म्हणत आमिर खानने ठोकला सोशल मीडियाला ‘राम राम!’

Actor Aamir khan to social media says post birthday decided to stop this pretence


बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान जगभरात लोकप्रिय आहे. पण त्याच्याबद्दल एक गोष्ट सर्वांनाच माहिती आहे की, त्याला जास्त लाईमलाईटमध्ये राहणे आवडत नाही. आमिरने त्याचे इंस्टाग्राम अकाउंट खूप उशिरा तयार केले आणि तो ट्विटरवरही कमी सक्रिय असतो. नुकतेच वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियाद्वारे आमिर खानवर शुभेच्छांचा पाऊस पडला. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल अभिनेत्यानेही सर्वांचे आभार मानले. मात्र, या नंतर त्याने असे काही सांगितले की, जे पाहून चाहत्यांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. यामुळे त्याचे चाहते थोडे निराशही झाले आहेत.

आमिरने इंस्टाग्रामवर एक स्टेटमेंट पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहले की, “नमस्कार मित्रांनो, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. तुमच्या अभिवादनांनी माझे हृदय अगदी भरून आले आहे. आणखी एक बातमी आहे की, सोशल मीडियावर माझी ही शेवटची पोस्ट असेल. मी अधिक सक्रिय आहे हे जाणून, मला आता हे थांबवायचे आहे. पूर्वी आपण जसे संपर्कात राहायचो, यापुढेही तसेच राहू. एकेपी (AKP- आमिर खान प्रॉडक्शन) ने स्वतःचे चॅनेल उघडले आहे. म्हणून माझ्याबद्दल आणि माझ्या चॅनेलबद्दल सर्व अपडेट तुम्हाला तिथे मिळतील.”

आमिर खान अशा कलाकारांपैकी एक आहे, जे सोशल मीडियावर असूनही फारसे सक्रिय राहत नाहीत. पण आमिर कधीकधी त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो, थ्रोबॅक फोटो आणि चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित न पाहिलेले क्षणही शेअर करत असे. आमिरच्या या निर्णयानंतर त्याचे चाहते या सर्व गोष्टी खूप मिस करतील.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आमिर खान ‘लालसिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खान दिसणार आहे. हा सिनेमा अद्वैत चंदन दिग्दर्शित आहे. हा चित्रपट टॉम हँक्सच्या लोकप्रिय हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चे अधिकृत रूपांतर आहे. चित्रपटातील सरदारच्या गेटअपमध्ये आमिर खानने बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ कारणामुळे आलियाला नकोय वडील महेश भट्ट यांच्या सारखा नवरा! वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-बड्डे गर्ल आलियाने ९ वर्षांच्या करियरमध्ये कमावलीय तब्बल ‘एवढ्या’ कोटींची प्रॉपर्टी

-दारुचे व्यसन, स्पोर्ट्स कार आणि पाहिलेले मोठे अपयश, जाणून घ्या हनी सिंगचा बॉलीवूडमधील प्रवास त्याच्या खऱ्या नावासह


Leave A Reply

Your email address will not be published.