Friday, July 18, 2025
Home वेबसिरीज ‘हाफ सीए 2’ टीझर आउट – आर्ची पुन्हा सज्ज !

‘हाफ सीए 2’ टीझर आउट – आर्ची पुन्हा सज्ज !

‘हाफ सीए 2’ (Half CA 2)चा टीझर आज चार्टर्ड अकाउंटंट्स डेच्या दिवशी प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये आर्ची मेहता सीए कसा बनतोय, त्याचा छोटासा प्रवास दाखवला आहे.

चार्टर्ड अकाउंटंट्सवर आधारीत ‘हाफ सीए’ या एमएक्स प्लेयरवरील शोचा पहिला भाग खूपच हिट झाला होता. आता प्रेक्षक त्याचा दुसरा भाग कधी येतोय याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मंगळवारी, नॅशनल चार्टर्ड अकाउंटंट्स डेच्या निमित्ताने ‘हाफ सीए 2’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘हाफ सीए 2’मध्ये आर्ची मेहता (जिची भूमिका अहसास चन्ना यांनी साकारली आहे) सीए होण्यासाठी पुढे काय करते, ते दाखवलं जाणार आहे. आता ती आर्टिकलशिप सुरू करते, जे सीए होण्याच्या प्रवासातलं एक कठीण पण जरूरी टप्पा असतो.

‘हाफ सीए 2’ मध्ये आपण बघणार आहोत की,आर्ची अभ्यास करताना लांब वेळ काम कसं करते, वाढत्या जबाबदाऱ्या आणि भावना कशा सांभाळते. तिच्या पहिल्या कमाईचा आनंदसुद्धा यात दिसणार आहे. शोमध्ये ज्ञानेंद्र त्रिपाठी नीरज गोयलची भूमिका करत आहेत, आणि या भागात ते पुन्हा एकदा सीए फायनल परीक्षा देण्यासाठी मेहनत घेताना दिसतील.

अभिनेत्री अहसास चन्ना म्हणाली की, ‘हाफ सीए’ चा पहिला भाग तिच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी खूप स्पेशल होता. तिने सांगितलं, “आर्चीची गोष्ट लोकांच्या मनाला लागली, कारण ती गोष्ट आपल्या सारख्या सामान्य लोकांसारखी आहे. खूप लोकांना आर्चीमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. या वेळी आपण बघणार आहोत की सीए होणं किती कठीण असतं, पण तरीसुद्धा विद्यार्थी हार मानत नाहीत आणि रोज मेहनत करत राहतात.”

‘हाफ सीए सीझन 2’ ची घोषणा गेल्या वर्षी नॅशनल चार्टर्ड अकाउंटंट्स डेच्या दिवशी झाली होती. हा शो ‘द वायरल फीवर’ (TVF) यांनी तयार केला आहे. या भागातही अहसास चन्ना, ज्ञानेंद्र त्रिपाठी, प्रीत कमानी आणि रोहन जोशी हे त्याच त्यांच्या जुन्या भूमिका करताना दिसणार आहेत. ‘हाफ सीए 2’ अमेझॉन एमएक्स प्लेयरवर पाहायला मिळणार आहे. तो तुम्ही अमेझॉन शॉपिंग अ‍ॅप, प्राइम व्हिडीओ, फायर टीव्ही, स्मार्ट टीव्ही आणि एअरटेल एक्स्ट्रीम अ‍ॅपवरही पाहू शकता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा  

भारतात बंदी असूनही दिलजितचा सरदार जी ३ घालतोय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; केली इतक्या कोटींची कमाई…

हे देखील वाचा