भर पावसात मुलासोबत फुटबॉल खेळला आमिर खान, व्हिडिओतून घडले बाप-लेकाच्या प्रेमळ नात्याचे दर्शन

‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या आपल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. आमिरचे चाहते त्याच्या या सिनेमासाठी खूपच उत्सुक आहेत. सिनेमाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सिनेमामुळे चर्चेचा धनी ठरलेला आमिर खान याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नुकतेच सोशल मीडियावर आमिर खान (Aamir Khan) याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो मुंबईच्या पावसात मजा करताना दिसत आहे. व्हिडिओत आमिर त्याचा मुलगा आझाद (Azad Khan) याच्यासोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओत बाप-लेकाच्या प्रेमळ नात्याचे दर्शन घडत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहतेही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हा व्हिडिओ स्वत: आमिर खान याने त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. आपल्या या खास क्षणाची झलक त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यामध्ये आमिर आणि त्याचा मुलगा आझाद मुंबईत आपल्या घरी पावसाचा आनंद घेत आहेत. या व्हिडिओत आमिरने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पँट परिधान केली आहे.

आमिर खान प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या फुटबॉल सेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मस्ती आणि खूप जास्त पाऊस.” या व्हिडिओत पावसाची मजा घेण्यासोबतच दोघेही आपल्या स्कोरबाबत चर्चाही करत आहेत. आझाद म्हणतो की, त्याने ३ गोल केले आहेत, तर दुसरीकडे आमिरही म्हणतो की, त्याने फक्त १ गोल केला आहे.

आमिर खानच्या या पोस्टवर चाहतेही कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “ही शानदार भावना आहे, पावसात फुटबॉल खेळणे स्वर्गाप्रमाणे आहे.” तसेच दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “मलाही तुमच्यासोबत फुटबॉल खेळायचे आहे.”

आमिर खान याच्या कामाबद्दल थोडंसं
आमिर खान याच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) ही देखील झळकणार आहे. विशेष म्हणजे, आमिर आणि करीना तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी दोघांनीही ‘थ्री इडियट्स’ आणि ‘तलाश’ या सिनेमांमध्ये काम केले होते. आता दोघेही ११ ऑगस्ट रोजी रिलीझ होणाऱ्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवताना दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post