Friday, March 29, 2024

बाबो! रणबीरच्या फीसमोर वाणीचे मानधन काहीच नाही, ‘शमशेरा’साठी पठ्ठ्याने घेतलंय चारपट मानधन

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमानंतर आता त्याच्या आगामी ‘शमशेरा‘ या सिनेमाचा टिझरही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. रणबीरच्या या सिनेमाच्या टिझरनंतर आता चाहत्यांना ट्रेलरचीही चांगलीच प्रतीक्षा लागली आहे. असे म्हटले जात आहे की, या सिनेमाचा ट्रेलर २४ जून रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या सिनेमात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच, त्याच्याव्यतिरिक्त सिनेमात वाणी कपूर, संजय दत्त यांच्यासोबत अनेक मोठ्या कलाकारांच्या भूमिका आहेत. सिनेमातील त्यांच्या भूमिकांकडे पाहता या कलाकारांनी किती मानधन घेतले असेल, हेदेखील जाणून घेण्यात चाहते उत्सुक आहेत.

यादीतील पहिले नाव आहे रणबीर कपूर
‘शमशेरा’ (Shamshera) या सिनेमाच्या टिझरमध्ये सर्वाधिक लक्ष कुणी वेधून घेतले असेल, तर ते म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने. रणबीरचा डाकूचा लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, रणबीरने या सिनेमासाठी कथितरीत्या २० कोटी रुपये मानधन घेतले आहे. शमशेराव्यतिरिक्त रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबतच पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टही दिसणार आहे.

संजय दत्त
रणबीर कपूरपाठोपाठ या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt) यानेही दमदार भूमिका साकारली आहे. तो एका क्रूर पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘शमशेरा’मध्ये त्याचा लूक खूपच वेगळा आहे. यापूर्वीही त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, संजयने या सिनेमासाठी तब्बल ८ कोटी रुपये मानधन आकारले आहे.

वाणी कपूर
या सिनेमात वाणी कपूर (Vaani Kapoor) हिने मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे. ‘चंदीगढ करे आशिकी’ या सिनेमानंतर ती लवकरच या सिनेमात झळकणार आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, वाणीला या सिनेमासाठी कथितरीत्या ५ कोटी रुपये मानधन मिळाले आहेत. असे सांगितले जात आहे की, वाणीदेखील या सिनेमात दमदार भूमिकेत दिसणार आहे.

रोनित रॉय
टीव्हीवरील सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता रोनित रॉय (Ronit Roy) हा अग्रस्थानी आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. कारण, त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. त्याने मालिकेव्यतिरिक्त अनेक सिनेमातही आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. असे सांगितले जात आहे की, या सिनेमासाठी त्याला ४ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच, असेही म्हटले जात आहे की, ‘शमशेरा’ या सिनेमात रोनित आपल्या चाहत्यांना सरप्राईज देणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा