Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड आयुष अन् महिमा दिसणार रोमँटिक अंदाजात, चित्रपटातील ‘होने लगा’ गाणे ‘या’ दिवशी होणार रिलीझ

आयुष अन् महिमा दिसणार रोमँटिक अंदाजात, चित्रपटातील ‘होने लगा’ गाणे ‘या’ दिवशी होणार रिलीझ

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि आयुष शर्मा अभिनित ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा ऍक्शन ड्रामा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. आता सोमवारी (८ नोव्हेंबर) चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘होने लगा’ चित्रपटाच्या रोमँटिक संगीत ऑफरचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये आयुष शर्मा आणि महिमा मकवाना रोमँटिक अवतारात दिसत आहेत.

या पोस्टरमध्ये अभिनेता आयुष शर्माने अभिनेत्री महिमाच्या मागे उभा राहून साडीचा पदर धरलेला दिसत आहे, तर महिमा लाजून मागे वळून पाहत आहे. तसेच पोस्टरमधील दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित करत आहेत. ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ या चित्रपटातील हे गाणे मंगळवारी (९ नोव्हेंबर) रोजी प्रदर्शित होणार आहे.

शब्बीर अहमद यांनी लिहिलेले हे रोमँटिक गाणे जुबिन नौटियालने त्याच्या सुरेल आवाजात गायले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी शबिना खान आणि उमेश जाधव यांनी केली असून, संगीत रवी बसरूर यांनी दिले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये राहुलियाला एक खतरनाक, भयानक आणि गुंड म्हणून जगासमोर आणले गेले आणि सलमान खानच्या पात्राचीही चाहत्यांना ओळख करून देण्यात आली.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सध्या सलमान खान ‘बिग बॉस १५’ होस्ट करत आहे आणि २६ नोव्हेंबरला तो ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्यामुळे तो सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला होता. या चित्रपटात तो पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ’अंतिम’मध्ये सलमान खान व्यतिरिक्त आयुष शर्मा देखील आहे. तसेच सलमान पुन्हा एकदा ‘टायगर ३’ च्या तिसऱ्या सीरिजमध्ये कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. त्याचवेळी सलमान ‘भाईजान’मध्येही दिसणार आहे, ज्याचे पूर्वीचे नाव ‘कभी ईद कभी दिवाली’ होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

-कमल हसन यांच्या ‘विक्रम’ सिनेमाने प्रदर्शनाआधीच केला रेकॉर्ड, चित्रपटाच्या फर्स्ट लुकला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा