Thursday, March 28, 2024

कमल हसन यांच्या ‘विक्रम’ सिनेमाने प्रदर्शनाआधीच केला रेकॉर्ड, चित्रपटाच्या फर्स्ट लुकला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद

आपल्या देशात मोठ्या आणि लोकप्रिय कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होणे म्हणजे जणू काही पर्वणीच असते. कलाकारांबद्दल प्रत्येकाचे मनात असणारे प्रेम हे वेगळेच असते. मात्र साऊथमध्ये कलाकारांबद्दल एक वेगळेच प्रेम, वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अगदी चातक पक्ष्यासारखे प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकाराच्या चित्रपटाची वाट बघताना दिसतात. चित्रपटाच्या पहिल्या लूकवर भरभरून प्रेम करणारी ही मंडळी सिनेमासाठी तर वेडीच असतात. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमल हसन यांच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

कमल हसन यांनी ७ नोव्हेंबर रोजी आपला ६७ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या आगामी ‘विक्रम’ सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित कऱण्यात आला आहे. लोकेश कनकराज दिग्दर्शित या ऍक्शन थ्रिलर सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित झाल्या झाल्या सुपर हिट ठरला आहे. हा लूक प्रदर्शित होऊन २४ तास होत नाही तोपर्यंत या फर्स्ट लुकला एक कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ रिलीजनंतर लगेचच ट्रेंडिंगमध्ये देखील आला आहे.

विक्रम सिनेमाच्या या फर्स्ट लूकमध्ये कमल हसन भरपूर्ण ऍक्शन करताना दिसत आहे. चहुबाजुंनी गोळ्या चालत असून, कमल एक लोखंडाच्या दरवाज्यासारख्या गोष्टीचा ढाल म्हणून वापर करताना दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी क्रूरता आणि त्यांचे डोळे सर्वांचेच मनं जिंकून घेत आहेत. त्या सिनेमातील त्यांच्या लूकने आधीच धमाल केली होती. आता या सिनेमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. केवळ २४ तासांच्या यात या व्हिडिओला १० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून, यावर ५ लाखांपेक्षा अधिक लाईक्स १३ हजारांपेक्षा अधिक कमेंट्स आले असून ट्विटरवर देखील हा व्हिडिओ ट्रेंडिंगवर आहे.

या रेकॉर्डब्रेक आकड्यांबद्दल घोषणा करताना चित्रपटाच्या निर्माते असणाऱ्या राज कमल फिल्म्स इंटरनेशनल यांनी ट्विट करत लिहिले, “‘विक्रम’ सिनेमाच्या फर्स्ट लुकला २४ तासात १ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.” या चित्रपटाच्या पहिल्या लुकला मिळलेल्या अमाप प्रतिसादावरून आपल्या लक्षात येईल की, ह्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये किती उत्सुकता आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल

-कॅटरिना आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी संपन्न, ‘या’ दिग्दर्शकाच्या घरी गुपचूप झाला कार्यक्रम

-काय सांगता! ‘सेक्रेड गेम्स’ वेबसीरिजमध्ये करायचे नव्हते नवाजुद्दीन सिद्दीकीला काम, स्वत:च सांगितले कारण

हे देखील वाचा