आदिनाथ कोठारे यांने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांना अनेकदा आदिनाथ कोठारे याच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. अभिनेता आदिनाथ कोठारे याने एका मुलाखतीत सांगितले की, त्यांने कॉलेजच्या काळात पहिल्यांदा दारू प्याली होती. तेव्हा तो फक्त 18 वर्षे होते आणि तो काही मित्रांसोबत पार्टी करत होते. याबाबतचा एक किस्सा आदिनाथने नुकतंच एका मुलाखतीत सांगितला आहे.
आदिनाथ म्हणाला, “अलिबागला आमच्या कॉलेजची सहल गेली होती. दिवसभर फिरून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही घराकडे निघालो होतो. मी आणि माझे तीन मित्र आम्ही दारु प्यायचो नाहीत. पण त्याबाबत एक कुतुहूल होते. अलिबागला आम्ही ठरवलं की आपण वाईन शॉपमधून दारु घेऊ. पण यावेळी आमची चांगलीच गोची झाली होती. कारण आमचे सर आमच्या पाठीमागे होते. आणि ते आमच्यावर लक्ष ठेवून होते.”
आदिनाथ पुढे म्हणाला, “मी पटापट चालत पुढे गेलो. पुढे जाऊन मी एका माणसाला विचारलं, ‘बीच कुठं आहे? आणि वाईन शॉप कुठं आहे?’ तो विचार करत होता. तोपर्यंत हे मागचे लोक माझ्या जवळ आले होते. आणि तेवढ्यात तो ओरडला, ‘बीच इधर है वाईन शॉप उधर है.’ प्रोफेसर आणि सगळे माझ्याकडे बघत होते. आम्ही रात्री सर्वांनी सगळे झोपल्यावर बसमध्ये दोन दोन बिअरचे घोट घेतले आणि आम्ही निघालो. ही गोष्ट सरांनी पाहिली आणि सर्वांना ही गोष्टी समजली होती.”
“आम्हाला वाटलं आता आम्हाला काॅलेजमधून काढून टाकतील. त्यांनी माझ्या वडिलांना कॉलेजमध्ये बोलवून घेतलं. पण मी अगोदरच त्यांना सगळं सांगितलं होतं. माझे वडील कॉलेजमध्ये आले आणि आमच्या प्रोफेसरांनी त्यांच्याकडे तक्रार केली. माझे वडील म्हणाले, ‘मला माहिती आहे त्याने बिअर घेतली आहे. यापुढे मी त्याला समजावून सांगेन. तो पुन्हा अस काही करणार नाही” असेही आदिनाथ यांनी सांगितले. आदिनाथ कोठारेच्या या किस्सामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या कॉलेजच्या काळातील आठवणी आल्या असतील.
ते प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे यांचे पुत्र आहेत. आदिनाथ यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि ‘माझा छकुला’ या चित्रपटात त्यांनी पहिली भूमिका केली. आदिनाथ यांनी अभिनेता म्हणून ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. (Actor adinath kothare revel when he drinking beer for the first time)
आधिक वाचा-
–विवेक अग्निहोत्रींनी आई-वडिलांबद्दल केला धक्कादायक खुलासा; म्हणाले, ‘माझे आई-वडील गांधीवादी…’
–प्रथमेश लघाटेची खतरनाक स्टाईल! होणाऱ्या पत्नीला ‘या’ नावाने मारतो हाक, एकदा वाचाच