Sunday, May 19, 2024

प्रथमेश लघाटेची खतरनाक स्टाईल! होणाऱ्या पत्नीला ‘या’ नावाने मारतो हाक, एकदा वाचाच

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वामध्ये प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. तेव्हापासूनच त्यांची मैत्री झाली आहे. या कार्यक्रमामुळेच त्या दोघांचे कुटुंबीयही गेली अनेक वर्षं एकमेकांना ओळखत आहेत. प्रथमेश लघाटे हा आजच्या तरुण पिढीतील आघाडीचा गायक आहे. त्याचा 29 सप्टेंबरला वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची होणारी बायको मुग्धा वैशंपायन हिने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली. त्याला प्रथमेशने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा आणि प्रथमेशचा (Prathamesh Laghate) एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती प्रथमेशला मिठी मारून फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. तर हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “हॅपी बर्थडे माय मॅन…” तर प्रथमेशनी मुग्धाची ही स्टोरी त्याच्या अकाउंटवरून रिपोस्ट केली आणि लिहिलं, “थँक यू मुगा…”

प्रथमेशने मुग्धाला मुगा अशी हाक मारल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. प्रथमेश आणि मुग्धा यांनी काही महिन्यांपूर्वी लग्नाची घोषणा केली होती. सध्या हे दोघं गोव्याला गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली आहेत. प्रथमेश आणि मुग्धाच्या चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रथमेश आणि मुग्धा लवकरच लग्न करणार आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की ते या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी लग्न करणार आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. काही दिवसांपुर्वी प्रथमेश लघाटेच्या केळवणाचीही जोरदार चर्चा रंगलेली होती. त्याचे चतुरंग प्रतिष्ठानतर्फे त्याचे केळवण करण्यात आले होते. हे त्याचे पहिलेच केळवण होते. आता मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाच्या चर्चांनी इंटनेटवर पुरता घुमाकूळ घातला आहे. (On the occasion of Prathamesh Laghatechi birthday today his wife Mugdha Vaishampayan shared a special post for him.)

आधिक वाचा-
‘प्रयोगानंतर एक काकू काठी टेकवत…’, संकर्षण कऱ्हाडेने प्रेक्षकांना केली विनंती, म्हणाला, ‘महाराष्ट्रात…’
विवेक अग्निहोत्रींनी आई-वडिलांबद्दल केला धक्कादायक खुलासा; म्हणाले, ‘माझे आई-वडील गांधीवादी…’

हे देखील वाचा