Friday, March 6, 2026
Home बॉलीवूड ‘जर सोनू निवडणुकीत उभा राहिला, तर मी त्यालाच मत देईल’, ‘हा’ अभिनेताही झाला सोनू सूदचा फॅन

‘जर सोनू निवडणुकीत उभा राहिला, तर मी त्यालाच मत देईल’, ‘हा’ अभिनेताही झाला सोनू सूदचा फॅन

कोरोना व्हायरसने मागील एक वर्षापासून जगभरात थैमान घातले आहे. यादरम्यान अनेक मोठ- मोठे दिग्गज जनतेच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यामध्ये सर्वाधिक कोण चर्चेत असेल, तर तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. सोनूने मागील वर्षी लागलेल्या लॉकडाऊनदरम्यान अनेक मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे मोलाचे काम केले होते. यामुळे त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सध्या सोनू गरजूंना औषधे आणि ऑक्सिजन पुरवण्याचे काम करण्यात व्यस्त आहे. त्याने कलाकारांनाही पुुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले होते. यादरम्यान त्याची कामगिरी पाहून सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे कलाकारही त्याचे चाहते झाले आहेत. एका अभिनेत्याने चक्क म्हटले की, सोनूने निवडणूक लढवली, तर तो सोनूलाच मत देईल.

बॉलिवूड अभिनेताही बनला चाहता
गरजू व्यक्तींची मदत करून सोनू सामान्य व्यक्तींचाच नाही, तर कलाकारांचाही आवडता बनला आहे. अभिनेता आदित्य सीलही सोनू सूदचा चाहता बनला आहे. त्याने म्हटले की, सोनू सूदने निवडणूक लढवली, तर तो त्याला नक्की मत देईल. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आदित्यने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलेली पोस्ट आता जोरदार व्हायरल होत आहे.

आदित्यने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले…
आदित्यने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ‘जर उद्या सोनू सूद निवडणूकीत उभा राहिला, तर माझं मत त्याला नक्की मिळेल.’ खरं तर आदित्यने सन २००२ मध्ये ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्याने ‘इंदू की जवानी’, ‘तुम बिन २’, ‘स्टुडंट ऑफ द इअर’, ‘पुरानी जीन्स’, ‘नमस्ते लंडन’, ‘वी आर फ्रेंड्स’ आणि ‘सलाम इंडिया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सोनू सूदचे आवाहन
खरं तर नुकतेच सोनू सूदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने सरकारला आवाहन केले होते. त्याने व्हिडिओ शेेअर करत म्हटले होते की, “ज्या मुलाने कोरोना काळात आपल्या आई- वडिलांना गमावले आहे, त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.”

हे देखील वाचा