लवकरच ‘तडप’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा पदार्पण चित्रपट आहे. अहान आणि तारा सुतारिया यांनी चित्रपटाच्या प्रमोशनाला सुरुवात केली आहे. प्रत्येक कलाकाराला ज्याप्रमाणे चित्रपटातील व्यक्तिरेखा चोखपणे साकारण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते, अगदी त्याचप्रमाणे अहानने देखील मेहनत घेतली आहे. नुकताच त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे की, ‘तडप’ या त्याच्या पदार्पण चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याने तब्बल ११ किलो वजन वाढवले आहे.
माध्यमांना दिलेल्या एका खास मुलाखतीत चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अहान म्हणाला की, “या चित्रपटासाठी माझे शारीरिक प्रशिक्षण खूप कठीण होते. कारण, या चित्रपटासाठी मला ११ किलो वजन वाढवावे लागले होते. मला पाहिजे ते खाऊ शकलो. मी दिवसातून ११ ते १२ वेळा जेवण करत होतो. कधी कधी मी दुपारचे जेवण करत होतो, जेव्हा माझ्यासाठी जास्त जेवण येत असे. हे करणे खूप कठीण होते, पण चित्रपट निर्मात्यांना त्या व्यक्तिरेखेसाठी ते शरीर हवे होते.”
तो पुढे म्हणाला की, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या सेटवर येण्यापूर्वी माझे आणि ताराचे नाते होते. जसे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिले होते, ज्यासाठी मला खूप सहज राहावे लागले आणि खूप लक्ष केंद्रित करावे लागले. मात्र, आम्हाला जे हवे होते ते मिळाले आहे.”
माध्यमांशी संवादादरम्यान, अलीकडेच अभिनेता अहानने या पात्राबद्दल सांगितले की, “ही सामान्य प्रेमकथा नाही. हे दोन भिन्न लोक असलेले एक पात्र आहे. हे खरोखर माझ्यासाठी एक आव्हान होते, पण मी ते स्वीकारले. ही व्यक्तिरेखा साकारणे थोडे कठीण होते.”
मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओने केली आहे आणि साजिद नाडियाडवाला ग्रॅंडसन एन्टरटेन्मेंट प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती झाली आहे. हा चित्रपट यावर्षी ३ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एफआयआर दाखल केल्याची माहिती देताना कंगनाने शेअर केला तिचा बोल्ड फोटो
-बॉलिवूडची सर्वात यशस्वी स्क्रिप्ट रायटरची जोडी ‘सलीम – जावेद’ तुटली तरी कशी, जाणून घ्या