Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अजय देवगण ‘डीसीपी रुद्र वीर सिंग’ बनून करणार शत्रूंचा खात्मा, बहूप्रतिक्षित ट्रेलर झाला रिलीझ

ओटीटी प्लॅटफॉर्म डिझनी प्लस हॉटस्टारच्या ‘रुद्र द एज ऑफ डार्कनेस’ या क्राइम ड्रामा मालिकेद्वारे बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) डिजिटल सीरिजच्या जगात प्रवेश करत आहे. या सीरिजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. डिझनी प्लस हॉटस्टारवर या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अजय देवगण डीसीपी रुद्र वीर सिंगच्या भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये सायकॉलॉजिकल क्राईम ड्रामा दाखवण्यात आला आहे. ट्रेलर पाहून असे वाटते की, प्रेक्षकांना या वेबसिरीजमधून थ्रिलर आणि सस्पेन्सचा डबल डोस मिळणार आहे.

या वेबसिरीजमध्ये अजय एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पण रंजक गोष्ट म्हणजे, अचानक त्याचे पात्र बदलते आणि तो एका गुन्हेगारी मनाच्या पोलिसाला भेटतो. ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra The Edge of Darkness) ही वेबसिरीज अतिशय प्रभावी आणि कोडे सोडवणारी आहे. सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करताना अजय देवगणने लिहिले की, “अंधाराने वेढलेला, मी न्यायाचा प्रकाश आणण्यासाठी तयार आहे.”

४ मार्चपासून हॉटस्टारवर होणार प्रसारित
अजय देवगणची ही वेबसिरीज क्राईम थ्रिलर ड्रामा आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ही सीरिज डिझनी प्लस हॉटस्टारवर ४ मार्चपासून प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजची निर्मिती बीबीसी स्टुडिओ आणि ॲप्लॉज एंटरटेनमेंट यांनी केली आहे. या सीरिजमध्ये ईशा देओल, राशी खन्ना, तरुण गेहलोत, सत्यदीप मिश्रा आणि आशिष विद्यार्थीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अजय देवगणची ही वेबसिरीज हिंदीसोबतच मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्येही प्रसारित होणार आहे. या वेबसिरीजचे शूटिंग मुंबईतील लोकप्रिय ठिकाणी झाले आहे. या सीरिजमध्ये अजय एका पूर्णपणे नवीन स्टाईलमध्ये कॉपची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ ही रहस्यमय सीरिज ‘लूथर’ या ब्रिटिश टीव्ही ड्रामावर आधारित आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा