×

अजय देवगणच्या ‘या’ आरोपांमुळे खचून गेली होती रवीना टंडन, केला होता आत्महत्येचा प्रयत्न

अजय देवगण (Ajay Devgan) हा हिंदी चित्रपटक्षेत्रातील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्य दमदार अभिनयाने अजय देवगणने गेली ३० वर्ष सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे. सध्या चित्रपटक्षेत्रातील प्रमुख अभिनेता अशीच अजय देवगणची ओळख आहे. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्याने एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटात काम केले आहे. सोशल मीडिया आणि वाद विवादांपासुन दूर असणाऱ्या अजयच्या नावावर अनेक राष्ट्रीय पुरस्कार आहेत. सध्या आपल्या वैवाहिक आयुष्यात मग्न असलेला अजय देवगण कधीकाळी एका अभिनेत्रीमुळे चांगलाच चर्चेत आला होता. काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊ.

आपल्या दमदार ऍक्शन आणि अभिनयामुळे सिनेसृष्टीत लोकप्रिय असलेला अजय देवगण हा बॉलिवूडचा सिंघम म्हणून सगळीकडे ओळखला जातो. सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर अल्पावधीतच अभिनेत्री काजोलसोबत (Kajol) विवाह करून, दोघांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली होती. मात्र सध्या सोशल मीडिया आणि माध्यमांपासून चार हात लांंब असणारा अजय देवगण कधी काळी आपल्या प्रेमप्रकरणांमुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्याकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन (Raveena Tandon) आणि करिश्मा कपूरसोबत (KarishmaKapoor) अजय देवगणच्या नात्याची चर्चा चांगलीच रंगली होती. इतकेच नव्हे, तर अजय आणि रवीना टंडनच्या प्रेमप्रकरणामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी त्याने दिलेल्या एका मुलाखतीने तर मोठा वाद निर्माण झाला होता.

त्यावेळी अजय देवगणवर अभिनेत्री रवीना टंडनने अनेक सणसणाटी आरोप केले होते. यामध्ये आमच्या दोघांमध्ये सुरुवातीला प्रेमप्रकरण सुरू होते, मात्र करिश्मा कपूरसाठी अजयने माझ्याशी संबंध तोडले, असा खुलासा तिने केला होता. यावर संतापलेल्या अजय देवगणने रवीनाला थेट खोटारडी म्हटले होते, ज्यामुळे चांगलाच वाद उभा राहिला होता. विशेष म्हणजे त्यावेळी अजय देवगण करिश्मा आणि रवीना दोघींसोबतही चित्रपट करत होता.

या संपुर्ण आरोपांवर बोलताना अजयने रवीना टंडनवर जोरदार टीका केली होती. यावेळी अजयने “रवीनाला उपचाराची गरज असून, मी बोलायला लागलो तर असे खुलासे करेन ज्यामुळे तिला तोंडही दाखवणे कठीण होइल” अशी धमकीच दिली होती. अजयच्या या मुलाखतीने रवीना खुपच दुखावली होती. इतकेच नव्हे, तर तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. आपल्याला अनेक चित्रपटातून काढून, ते चित्रपट करिश्माला दिल्याचा धक्कादायक आरोपही तिने अजय देवगणवर केला होता.

साल १९९४मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अजयने रवीनावर जोरदार हल्ला करताना, “रवीना माझी कधीच मैत्रीण नव्हती आणि माझं कधी तिच्यावर प्रेमही नव्हतं,” असा खुलासा केला होता. सोबतच तिने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे आरोप केले असून, मी कधीही ते विसरू शकत नसल्याचे तो म्हटला होता. दरम्यान या सगळ्या आरोपांमुळे हे प्रकरण चांगलेच तापले होते.

हेही वाचा :

Latest Post