[rank_math_breadcrumb]

तमिळनाडूमध्ये मोठी दुर्घटना; अजित कुमारचा २५० फूट उंच बॅनर अचानक कोसळला

तमिळनाडूतील तिरुनेलवेली येथील एका मल्टीप्लेक्सबाहेर झालेल्या अपघातातून तमिळ सुपरस्टार अजित कुमार (Ajith Kumar) यांचे चाहते थोडक्यात बचावले. खरंतर, मल्टीप्लेक्सच्या बाहेर २५० फुटांपेक्षा जास्त उंचीचा अभिनेत्याचा बॅनर लावण्यात आला होता. जो अचानक कोसळला. त्याच्या आगामी ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही दिवस आधी ही घटना घडली.

अचानक बॅनर पडताना पाहून तिथे उपस्थित असलेले चाहते घाबरून पळून गेले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जर चाहते वेळीच त्या ठिकाणाहून पळून गेले नसते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, असे व्हिडिओमध्ये दिसून येते.

६ एप्रिल रोजी, अजित कुमारचे चाहते तिरुनेलवेली येथील पीएसएस मल्टीप्लेक्समध्ये ‘गुड बॅड अग्ली’च्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त होते. त्यावेळी तिथे लावलेला मोठा बॅनर अचानक कोसळला. तिथे उपस्थित असलेले लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व चाहते सुखरूप बाहेर पडले. या घटनेच्या व्हिडिओची आता सर्वत्र चर्चा होत आहे, परंतु अजित कुमार किंवा त्यांच्या चित्रपटाच्या टीमकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही.

२०२३ मध्ये, अजितच्या ‘थुनिवु’ चित्रपटाच्या प्रीमियर स्क्रीनिंग दरम्यान एका चाहत्याचा मृत्यू झाला. यानंतर, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून तामिळनाडू सरकारने सकाळी लवकर होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली होती. अजितने नेहमीच त्याच्या चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे परंतु काही चाहते अजूनही उत्साहापोटी मोठे कार्यक्रम आयोजित करतात.

या सगळ्यामध्ये, अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’ हा चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अधिक रविचंद्रन दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर ४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हा एक मोठ्या बजेटचा अ‍ॅक्शन चित्रपट आहे. यामुळे अजितच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेले जाईल अशी चाहत्यांना आशा आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘विदामुयार्च्यी’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता, त्यामुळे यावेळी सर्वांच्या नजरा या चित्रपटावर आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

मुस्लिम कार्यकर्त्यांनी केली ‘सिकंदर’वर बहिष्कार टाकण्याची मागणी, दिग्दर्शक एआर मुरुगादोस आहेत कारण
गौतमी पाटीलची पहिलीचं गवळणं प्रदर्शित, “कृष्ण मुरारी” गाणं सोशल मीडियावर व्हायरल! गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” गाणं प्रदर्शित!