Wednesday, July 3, 2024

‘बेलबॉटम’ चित्रपटातील नवीन गाणे रिलीझ; अक्षय कुमार अन् वाणी कपूरच्या केमिस्ट्रीने वेधले लक्ष

मागील अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वात फक्त आणि फक्त एकाच चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे, आणि तो सिनेमा म्हणजे अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ होय. हा सिनेमा अनेक कारणांसाठी लाईमलाईट्मधे येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीपासूनच सिनेमाबद्दल लोकांच्या मानत खूपच उत्सुकता होती, आणि आता ट्रेलर आल्यानंतर तर ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक महिन्यांनी मोठ्या पडद्यावर सिनेमा प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांनाही चित्रपटगृहांमध्ये जाऊन तो बघता येणार आहे. या सर्व गोष्टींमध्ये नुकतेच या चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘सखियां 2.0’ हे गाणे लाँच केले आहे. ‘सखियां’ हे गाणे २०१८ साली प्रदर्शित झालेल्या पंजाबी गाणे ‘सखियां’चे रिमेक गाणे आहे. या गाण्याचा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले, “मित्रांनो आता मी ‘सखियां 2.0’ गाण्याची वाट पाहू शकत नाही. गाणे प्रदर्शित झाले आहे.”

हे गाणे जर आपण पहिले, तर या गाण्यात अक्षय आणि वाणीची दमदार केमेस्ट्री दिसत आहे. (akshay kumar and vaani kapoor second romantic song sakhiyan 2.0 release)

गाण्यात दिसणारे लोकेशन, अक्षय आणि वाणी यांचा कुल अंदाज, दमदार म्युझिक असल्यामुळे गाणे नक्कीच जबरदस्त हिट होणार हे नक्की. गाण्यात वाणी आणि अक्षयचा डान्सदेखील बघण्याजोगा आहे. या गाण्याला बब्बू, मनिंदर बुट्टर आणि तनिष्क बागची या तिघांनी संगीत दिले असून, मनिंदर आणि जारा खान यांनी त्यांच्या आवाजात हे गाणे गायले आहे. याआधी सिनेमातील ‘मरजावां’ हे गाणे प्रदर्शित झाले असून, या गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणारी वाणी आणि अक्षयची जोडी देखील सर्वांनाच आवडताना दिसत आहे.

अक्षयचा ‘बेलबॉटम’ हा सिनेमा येत्या १९ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. लॉकडाऊननंतर प्रदर्शित हिणारा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. महाराष्ट्रात जरी चित्रपटगृह बंद असले, तरीही इतर राज्यांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणारी लारा दत्ता देखील सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा