Thursday, March 5, 2026
Home बॉलीवूड अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती चिंताजनक, आयसीयूमध्ये करण्यात आले दाखल

अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती चिंताजनक, आयसीयूमध्ये करण्यात आले दाखल

बॉलिवूडचा खिलाडी उर्फ अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांतील माहितीनुसार, त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयातच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आईला भेटण्यासाठी यूकेहून मुंबईला परतला आहे. अक्षय कुमार सोमवारी पहाटे, आपली आजारी आई अरुणा भाटियाला भेटण्यासाठी ब्रिटनहून परतला आहे.

अक्षयची आई हिरानंदानी रुग्णालयात दाखल
अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांना काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असून, त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमार देखील युकेहून त्याच्या ‘सिंड्रेला’ या चित्रपटाची शूटिंग सोडून भारतात परत आला आहे. अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. म्हणूनच त्याला जेव्हा समजले की आईची तब्येत बिघडली आहे. त्याने लगेच शूटिंग मधूनच सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. (Actor Akshay Kumar’s mother Aruna Bhatia is in critical condition)

अक्षय कुमार गेल्या काही आठवड्यांपासून यूकेमध्ये त्याच्या आगामी ‘सिंड्रेला’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. माध्यमांतील माहितीनुसार, अक्षय कुमार त्याच्या आईसोबत राहण्यासाठी परत आला आहे. त्याने निर्मात्यांना त्या सीन्सचे शूटिंग सुरू ठेवण्यास सांगितले आहे, ज्यात त्याच्या उपस्थितीची आवश्यकता नाही. अरुणा भाटिया यांचे वय ७७ वर्षे आहे आणि काही वर्षांपूर्वी त्यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्या एक चित्रपट निर्मात्या असून त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यापैकी ‘हॉलिडे’, ‘नाम शबाना’ आणि ‘रुस्तम’ या चित्रपटांचा समावेश आहे.

अक्षय कुमार कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने १९९१ मध्ये ‘सौगंध’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु त्याला अभिनय क्षेत्रातील त्याचे पहिले यश एक वर्षानंतर ‘ऍक्शन थ्रिलर खिलाडी’ या चित्रपटातून मिळाले होते. त्याचबरोबर मागील काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘बेल बोटम’ चित्रपट बराच चर्चेत होता. तर अक्षय कुमारने आपल्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा