Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड अर्रर्र! अली- रिचाच्या लग्नात फोन घेऊन जाण्यास परवानगी, पण ‘ही’ अट करावी लागेल मान्य

अर्रर्र! अली- रिचाच्या लग्नात फोन घेऊन जाण्यास परवानगी, पण ‘ही’ अट करावी लागेल मान्य

बाॅलिवूडची आणखी एक जाेडी लग्न बंधनात अडकणार आहे. ते दुसरे-तिसरे काेणी नसून अली फजल आणि रिचा चड्ढा आहेत. गेल्या दिवसांपासून हे दाेघेही त्यांच्या लग्नामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. आपल्या लग्नासाठी दाेघेही खूपच उत्साही आहेत. अशातच त्यांच्या लग्नाबद्दल माेठी माहिती समाेर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पाहुण्यांना लक्षात घेत दाेघांच्या लग्नानिमित्त नियमावली बनवण्यात आली आहे.

दाेघे 6 ऑक्टाेबरला अडकणार लग्नबंधनात
अली फजल (Ali Fazal) आणि रिचा चड्ढा (Richa Chaddha) दाेघांच्या लग्नाच्या विधी 30 सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहेत, तर 6 ऑक्टाेबरला दाेघे लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्न साेहळ्यात ‘नाे फाेन पाॅलिसी’ ठेवण्यात आली नाही. फक्त एक छाेटीशी अट आहे, ते म्हणजे पाहुणे लग्नाचे फाेटाे काढू शकणार नाहीत. ही अट मान्य असल्यास ते फाेन आणू शकतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, असे सांगितले जात आहे की, हा निर्णय यासाठी घेतला गेला. कारण, पाहुणे कुठलीही चिंता न करता आनंदाने लग्न एन्जॉय करू शकतील. जाेडप्यांची इच्छा आहे की, या साेहळ्यात उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची विशेष काळजी घ्यावी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हायरल
नुकतीच दाेघांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली हाेती. जाेडपे आपल्या लग्नाला खास बनवण्यासाठी एकही संधी साेडत नाहीयेत. हेच कारण आहे की, त्यांनी आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची हटके डिझाईन केली आहे. दाेघांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका माचिसच्या डब्बीसारखी आहे. त्याचसाेबत या पत्रिकेला बघून 90च्या दशकातील काळ आठवत आहे.

हेही वाचा- ‘ब्रह्मास्त्र’च्या डायरेक्टरने थेट ‘आयरन मॅन’शी केली शाहरुखची तुलना, पण का? घ्या जाणून

बाॅलिवूड व्यतिरिक्त हाॅलिवूडमध्ये केलं अली फजलने काम
अली फजल (Ali fazal) याच्या वर्कफ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘थ्री इडियट्स’सारख्या चित्रपटातून छाेटीशी भूमिका साकारत करिअरला सुरुवात केली हाेती. अली फजल अनेक दमदार चित्रपटांमध्ये दिसला आहे. अलीने बाॅलिवूड व्यतिरिक्त हाॅलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचे काैशल्य दाखवले आहे. ‘फ्यूरियस 7’, ‘विक्टोरिया’ आणि ‘अब्दुल’ हे त्याचे मुख्य हॉलिवूड चित्रपट आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकअप! ‘बिग बॉस 15’मधील प्रसिद्ध जोडी कायमची झाली वेगळी, सोशल मीडियावरून दिली माहिती
साऊथमध्ये बिनसलं! YCP सरकारवर भडकले कलाकार, नागार्जुन यांनी थेट नंदामुरींनाच विचारला प्रश्न

हे देखील वाचा