Thursday, April 25, 2024

रिचा चड्ढाच्या चाहत्यांनी अली फजल सोडून भलत्याच अलीसोबत बनवली जोडी, अभिनेत्रीने ट्वीटद्वारे दिले उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिने चित्रपटामध्ये छोट्यामोठ्या भूमिका साकारुन आपली ओळख निर्माण केली आहे. तिने ‘ओय लक्की’ या चित्रपटात कॉमेडियन म्हणून भूमिका निभावली होती. ती लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे. मात्र, सोशल मीडियावर तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या पतीचे भलतेच नाव टॅग केल्यामुळे तिने एक ट्विटद्वारे संताप व्यक्त केला आहे.

रिचा चड्ढा(Richa Chadha) लग्नामुळे खूप चर्चेत आली आहे. लवकरच ती तिचा बॉयफ्रेंड अली फजल(Ali Fazal) याच्यासोबत विवाह करणार आहे. माध्यमातील वृत्तानुसर या जोडप्याने लग्नाची जोरदार तयारी सुरु केली आहे. यांच्या लग्नाची बातमी आल्यापासून चाहतेही खूपच खूश आहेत. सोशल मीडियाद्वारे यांना लग्नाच्या शुभेच्छा येणे सुरु झाले आहे. मात्र, सोशल मीडियावर काही युजर्सने फोटो शेअर करत असताना रिचा चड्ढासोबत अली फजलच्या जाग्यावर चुकीच्या नावाला टॅग करत आहेत. यामुळे रिचाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रिचा चड्ढा आणि अली फजल खूप दिवसापासून एकमेकांना डेट करत असून ते लवकरच लग्नही करणार होते. पण कोरोना महामारी आल्यामुळे यांचे लग्न लांबणीवर गेले होते. माहितीनुसार हे जोडपे या महिन्याच्या अखेरपर्यंत लग्न करणार आहे. मात्र, या लग्नामध्ये सोशल मीडियावर नवरदेवाच्या नावाचा चुकीचा टॅग करत आहेत. तिच्या पतीचे नाव ‘अली फजल’ आहे आणि तो एक अभिनेता आहे पण, काही युजर्स चुकीने ‘अली जफर’ (Ali zafar)हे नाव ‘टॅग करतात जो की,एक पाकिस्तानी सिंगर आणि अभिनेता आहे. रिचाने या दोन्ही नावामधला फरक सांगितला आहे.

रिचा चड्ढाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक ट्वीट करत लहिले आहे की, “अली जफर पाकिस्तानी सिंगर आणि अभिनेता आहे जो की, आधीच विवाहीत आहे”. रिचाने एका ट्वीटर यूजरला ट्वीट करत असे उत्तर दिले आहे. आणि तिच्या या उत्तरावर अन्य युजरने कमेंट करत लिेहिले आहे की,” यापेक्षा चांगले गुड्डु भैय्या लिही.”

वृत्तपत्राच्या माहितीनुसार रिचा चड्ढा आणि अली फजल हे ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात लग्न करणार आहेत. लग्नाचे काही कार्यक्रम दिल्लीमध्ये होणार आहेत तर काही कार्यक्रम मुंबईमधघ्ये होणार आहेत. हे कार्यक्रम 5 दिवस चालणार असुन कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी मेहंदी आणि हळदी समारंभही ठेवणार आहेत. या कार्यक्रमामध्ये 350 ते 400 पाहुणे येणार आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाच
‘अगं अगं आई…’, म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा ओंकार दिसणार मुख्य भूमिकेत, पण नायिका कोण?
प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच ! जाणून घेऊया ‘व्हिक्टोरिया’चे रहस्य
अनुपम खेर यांनी चौपाटीवर महिला सफाई कामगारासोबत केला डान्स, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा