बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि रिचा चड्डा यांच्या लग्नाची प्रतीक्षा आता संपणार आहे. दि. 4 ऑक्टोबरला हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांच्या प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, अली फजलचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याची बहीण ट्युलिप फजलसोबत डान्स करताना दिसत आहे. दोन्ही भाऊ-बहीण ‘सुबाह होने ना दे’ या बॉलिवूड गाण्यावर डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
प्री वेडिंग फंक्शनमध्ये अली फजलने केला डान्स
अली फजल(Ali Fazal) याचा हा व्हिडिओ त्याच्या प्री-वेडिंग फंक्शनचा आहे, जो अलीची बहीण ट्युलिप फजलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओसोबत ट्युलिपने लिहिले आहे की, ‘अली फजल आणि रिचा चड्डा दोघांसाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. तुम्हा दोघांनाही प्रेम, आनंद आणि शुभेच्छा. तिने त्याच्या पोस्टमध्ये #bhaikishaadi आणि #weddingbells हे हॅशटॅग देखील जोडले आहेत.
View this post on Instagram
रिचा चड्ढा-अली फजल यांच्या लग्नाची जाेरदार हाेत आहे चर्चा
रिचा चड्डा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) एका आठवड्यापूर्वी त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी दिल्लीला गेले होते. शुक्रवार (दि.1 ऑक्टाेबर) पासून दोघांच्या लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यासोबतच रिचा आणि अलीच्या मेहंदी आणि संगीताचे फोटो व्हिडिओ एकामागून एक समोर येत आहेत. रिचा चड्डा आणि अली फजल मुंबईतील द ग्रेट ईस्टर्न होममध्ये रिसेप्शन पार्टी देणार आहेत. ही 176 वर्षे जुनी जागा एकेकाळी गिरणी होती.
अली फजल आणि रिचा चड्डा 2015 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2017 मध्ये त्या दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. ‘फुकरे’ चित्रपटात ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. याशिवाय दोघेही ‘फुकरे रिटर्न्स’मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसले होते. याशिवाय नेटफ्लिक्सच्या ‘कॉल माय एजंट: बॉलीवूड’मध्ये दोघांनाही छोटी भूमिका मिळाली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाला चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, “रामायनाची गोष्ट आहे का व्हीएफएक्स?
प्रख्यात अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टी शोकसागरात