Monday, July 1, 2024

अरर! अल्लू अन् रश्मिकाचा ‘पुष्पा’ चित्रपट हिंदीत रिलीझ करण्याचा प्लॅन स्थगित, कारण…

तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे दोघेही ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. या चित्रपटाची गाणी यापूर्वीच सुपरहिटच्या यादीत आली आहेत. या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अल्लू आणि रश्मिकाचा पूर्णपणे वेगळा अवतार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मात्र, या चित्रपटाबद्दल बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अल्लूने त्याच्या हिंदी व्हर्जनचे प्रदर्शन सध्यातरी पुढे ढकलले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, अल्लू अर्जुन चित्रपटाचे निर्माते, मैथ्री मूव्ही मेकर्स आणि बॉलिवूडसाठी डबिंगचे हक्क धारण करणारा माणूस यांच्यात करार करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु परिस्थिती लवकरच निवळेल असे दिसत नाही. चित्रपट प्रदर्शित होण्यास दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे.

या चित्रपटाची फर्स्ट कॉपी अद्याप तयार न झाल्याने ते इतक्या कमी वेळात बॉलिवूडमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करू शकणार नाहीत, असा निर्मात्यांचा विश्वास आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, ‘पुष्पा’ चित्रपट सध्या तेलुगूसह हिंदीत प्रदर्शित होऊ शकत नाही, तर चित्रपटाचे मल्याळम आणि तमिळ व्हर्जन एकाच तारखेला प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, अल्लू अर्जुन चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कारण सध्या काही गाणी आणि सीनच्या पॅच वर्कचे काम सुरू आहे. हा चित्रपट हिंदीत कधी प्रदर्शित होणार याची अंतिम तारिख अद्याप जाहीर झालेली नाही. हा चित्रपट एका चंदन तस्कराच्या जीवनावर, त्याची वन अधिकारी आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीवर आधारित आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे, तर मल्याळम अभिनेता फहाद फासिल एका वाईट पोलिसाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट यावर्षी १७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेता वरुण धवनची भाची अंजिनीच्या ग्लॅमरस फोटोंचा सोशल मीडियावर राडा, हॉट ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

-‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

-कपूर बहिणी झाल्या ट्रोल! जान्हवी अन् खुशीने दिलेली पोझ पाहून, नेटकरी विचारतायेत ‘असे’ प्रश्न

हे देखील वाचा