Saturday, April 20, 2024

‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

दाक्षिणात्य अभिनेता सूर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच त्यातील काही सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा सीन प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्याशी संबंधित होता, त्यामुळे सोशल मीडियावर याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, हा सीन जाणूनबुजून वादाला तोंड फुटण्यासाठी चित्रीत करण्यात आला आहे. वाढता वाद पाहता, अभिनेते प्रकाश राज यांनी यावर आपली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

चापट मारणाऱ्या सीनवर आहे वाद
खरं तर, ‘जय भीम’ चित्रपटातील एका सीनमध्ये प्रकाश राज एका व्यक्तीला चौकशीदरम्यान चापट मारतात. कारण तो हिंदीत बोलत असतो. प्रकाश या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. जेव्हा ते एका व्यक्तीची चौकशी करत असतात, तेव्हा तो हिंदीत बोलतो. ज्यावर प्रकाश त्याला चापट मारतात. त्यावर अनेकांचे असे म्हणणे आहे की, चित्रपटात जाणूनबुजून हिंदी भाषिक लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकरण वाढताना पाहून प्रकाश राज यांनी मौन सोडले आहे. (Actor Prakash Raj Replied On The Controversial Slap Scene of Jai Bhim)

या सीनबाबत बोलताना प्रकाश राज यांनी म्हटले की, “‘जय भीम’ चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना आदिवासी लोकांचे हाल दिसले नाहीत. त्यांना अन्यायाबाबत दिसले नाही. शिवाय त्यांना या लोकांची समस्या जाणवली नाही. मात्र, त्यांनी पाहिले, ते फक्त चित्रपटातील एक चापट. त्यांना केवळ इतकेच समजले. यातून त्यांचा अजेंडा समोर येतो.”

“चापट दिसली, पण आदिवासी लोकांचे दु:ख दिसले नाही”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “उदाहरणासाठी हिंदीवर दक्षिण भारतीय लोकांचा राग त्यांच्यावर थोपवला जात आहे. एखाद्या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलीस अधिकाऱ्याला हे माहित आहे की, स्थानिक भाषा जाणणारा माणूस हिंदीत बोलून चौकशीला चकवा देण्यासाठी हिंदी बोलणे निवडतो, तेव्हा त्याची प्रतिक्रिया कशी असेल? त्याचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे, बरोबर? हा चित्रपट १९९० च्या काळातील आहे. त्या पात्रावर हिंदी लादली असती, तर त्यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली असती. कारण माझीही तीच विचारसरणी आहे आणि मी त्या विचारावर ठाम आहे.”

प्रकाश राज यांनी त्या मुद्द्यांवरही आपले मत मांडताना म्हटले की, “अशा वादांवर प्रतिक्रिया देण्याचा काहीच अर्थ नाही. काही लोकांना चापट मारणाऱ्या सीनने चिंतेत टाकले आहे. कारण, स्क्रीनवर प्रकाश राज होता. असे लोक आतापेक्षा जास्त नग्न दिसतात. कारण, त्यांचे विचार समोर आले आहेत. जर आदिवासी लोकांचे दु:ख त्यांना दिसत नाही. अशा कट्टरपंथींवर प्रतिक्रिया देण्यास काहीच अर्थ नाही.”

‘जय भीम’ या चित्रपटाचे स्ट्रिमिंग ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होत आहे. या चित्रपटात आदिवासी समुदायातील लोकांच्या समस्या दाखवल्या आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये अभिनेता सूर्या आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कॅटरिना कैफला विकी कौशलच्या आईकडून मिळालं स्पेशल गिफ्ट! लग्नाच्या बातम्यांनी धरला जोर

-तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

-विकी कौशल आणि कॅटरिना राजस्थानमध्ये राजेशाही थाटात करू शकता लग्न, डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन रद्द

हे देखील वाचा