आपण पडद्यावर अनेक कलाकारांना एकत्र काम काम करताना पाहतो. पडद्यावर अनेक कलाकार मैत्रीच्या भूमिकेत दिसतात. मात्र, अनेक कलाकार असे आहेत, जे पडद्यावर जरी एकत्र दिसत असले, तरी खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकांचे दुश्मन असतात. अमिताभ बच्चन यांना इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्यांचे मार्गदर्शक म्हणून पाहतात. पण काही कलाकार असे देखील आहेत ज्यांच्या अमिताभ बच्चन यांच्या सोबत ३६चा आकडा आहे. आज आपण अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधील त्यांच्या ७ शत्रूंबद्दल जाणून घेऊया.
विनोद खन्ना
एक असा काळ होता जेव्हा विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र सुपरहिट चित्रपट केले. ‘अमर’, ‘अकबर अँथनी’, ‘परवरिश’ ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘हेरा फेरी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात दोघेही एकमेकांचे कट्टर दुश्मन होते. विनोद खन्ना एकामागून एक सुपरहिट चित्रपट करत होते आणि ते अमिताभ यांच्या बरोबरीने येणार होते. तेव्हापासून या दोघांमध्ये वाद झाला आणि दोघे अनेक वर्षे एकमेकांशी बोललेही नव्हते.
शत्रुघ्न सिन्हा
शत्रुघ्न सिन्हा ७० च्या दशकात अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मोठे स्टार म्हणून समोर आले होते. यामुळे त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाला. एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की, “मला ‘काला पत्थर’च्या सेटवर अमिताभ यांच्या शेजारी कधीही खुर्चीची ऑफर देण्यात आली नव्हती. शूटिंगनंतर लोकेशनवरून हॉटेलला जाताना अमिताभ यांनी मला त्यांच्या कारमध्ये येण्याची ऑफरही दिली नाही.” त्यामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.
ऋषी कपूर
ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यातील वाद सर्वांना माहित आहे. बॉबी चित्रपटासाठी ऋषी कपूर यांना १९७३ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अमिताभ यांना ‘जंजीर’ चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळेल अशी आशा होती, पण नंतर माहित झाले की, ऋषी कपूर यांनी पैसे देऊन हा पुरस्कार खरेदी केला होता आणि यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
राजेश खन्ना
‘काका’ म्हणून प्रसिद्ध असलेले राजेश खन्ना यांचाही अमिताभ बच्चन यांच्या शत्रूंच्या यादीत समावेश आहे. अमिताभ हे राजेश खन्ना यांच्या स्टारडमला स्पर्धा देत होते आणि अचानक या गोष्टीचा अहंकार अमिताभ बच्चन यांच्यामध्ये आला आणि त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत वाद निर्माण केला होता. दोघे अनेक वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते. दोघांनी ‘आनंद’ आणि ‘नमकहराम’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांनी पडद्यावर जितके प्रेम दाखवले तितकाच खऱ्या आयुष्यात त्याच्यांत अधिक द्वेष दिसत होता.
रणधीर कपूर
रणधीर आणि बच्चन कुटुंब नातेवाईक होणार होते, तेव्हा हा वाद निर्माण झाला. रणधीर कपूर यांची मुलगी करिश्माचे लग्न अमिताभ यांचा मुलगा अभिषेकशी होणार होते. पण अचानक असे काही घडले की, साखरपुडा झाल्यानंतर हे नाते तुटले. यानंतर अमिताभ आणि रणधीर यांनी अनेक वर्षे एकमेकांचे तोंडही पाहिले नाही.
सलमान खान
सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यातील वैर बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय यांच्यामुळे सुरू झाले. सलमानला ऐश्वर्याशी लग्न करायचे होते. पण ऐश्वर्याने त्याच्या वाईट वर्तनामुळे त्याला सोडले. यानंतर ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न केले होते. येथून दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला होता.
संजय दत्त
संजय दत्तसोबत अमिताभ बच्चन यांचा वाद ‘खुदा गवाह’ या चित्रपटापासून सुरू झाला. आधी संजय दत्तला चित्रपटात भूमिका दिली जाणार होती. पण नंतर संजयने अमिताभ यांच्या चित्रपटात काम करणार नाही असे सांगून चित्रपट करण्यास नकार दिला आणि येथून दोघांमध्ये वाद सुरु झाला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण
सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे










