Monday, July 1, 2024

असे काय घडले की, अमिताभ बच्चन यांनी काढले बूट अन् चाहत्यासमाेर जाेडले हात

मेगास्टार अमिताभ बच्चन गेली अनेक दशके बॉलिवूडवर राज्य करत आहेत. गेल्या अनेक वर्षात अमिताभ बच्चन यांनी उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘शाेले’, ‘डाॅन’, ‘कभी खूशी कभी गम’, ‘माेहब्बते’, ‘पा’ , ‘भूतनाथ’ या दमदार चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपट कोणताही असो, अमिताभ बच्चन आपल्या अभिनय कौशल्याच्या जादूने चाहत्यांना भुरळ पाडतात. देशाचे मोठे स्टार झाल्यानंतरही अमिताभ बच्चन यांच्या शैलीत नम्रता कायम आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची माेठी गर्दी पाहायला मिळते. रविवारी (दि. 30 ऑक्टाेबर)ला अमिताभ बच्चन घरातून बाहेर आले आणि त्यांनी शूज काढले. यानंतर बाहेर येऊन चाहत्यांना नमस्कार केला. याचे फोटोही अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर शेअर केले आहेत. मात्र, आता जलसाच्या बाहेर पहिलेसारखा उत्साह नाही आणि चाहत्यांची गर्दी नाही, असे त्यांचे मत आहे.

 amitabh bachchan

अमिताभ बच्चन यांनी रविवारी (दि. 30 ऑक्टाेबर) त्यांच्या ब्लॉगवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी छठ पूजेचे फोटोही शेअर केले आहेत. या फाेटाेंसह अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, “छठ पूजा, सूर्य देवाच्या उपासनेचा दिवस.” या दिवशी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये समुद्राच्या पाण्याची पूजा केली जाते. या विशेष दिवसाबद्दल अभिनंदन. अमिताभ बच्चन यांनी पूजाचे फोटोही शेअर केले आहेत. ज्यात पूजेचे साहित्य ठेवले आहेत, ज्यामध्ये दिवा, कळस आणि नारळ दिसत आहेत.

 amitabh bachchan

अमिताभ जेव्हा त्यांच्या चाहत्यांना भेटतात तेव्हा ते बूट काढतात. यावेळी त्यांनी त्यांचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, “जेव्हा मी माझ्या शुभचिंतकांना भेटतो तेव्हा मी माझे बूट काढतो. ही माझ्यासाठी भक्ती आहे.” अमिताभ बच्चन यांच्या या स्टाइलने त्यांचे चाहतेही थक्क झाले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हुमा कुरेशी अन् मुदस्सर अजीज झाले वेगळे, तीन वर्षांपासून एकमेकांना करत होते डेट
अर्रर्र! कंगना रणौतमुळे विद्या बालन होऊ शकली नाही ‘इंदिरा गांधी’?

हे देखील वाचा