Tuesday, July 23, 2024

अर्रर्र! कंगना रणौतमुळे विद्या बालन होऊ शकली नाही ‘इंदिरा गांधी’?

निर्माता सिद्धार्थ राॅय कपूर पत्रकार सागरिका घोष यांच्या ‘मिसेस गांधी’ या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित मालिका बनवणार होते. विद्या बालन हिला या मालिकेत इंदिरा गांधींची भूमिका साकारायची होती. मात्र, आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सिद्धार्थ रॉय कपूरचा हा प्रोजेक्ट नुकताच पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकल्प पुढे ढकलण्याचे कारण सध्याची राजकीय परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे.

विद्या बालनला साकारायची हाेती इंदिरा गांधींची भूमिका
सिद्धार्थ राॅय कपूर (Siddharth Roy Kapur) हे ‘मिसेस गांधी’ (Mrs. Gandhi) या पुस्ताकावर आधारित मालिका बनवणार हाेते. मात्र, सध्याची राजकीय परिस्तिथी आणि कंगना रणौत (kangana ranaut)हिच्या आगामी चित्रपटामुळे सिद्धार्थ कपूर यांचा हा प्रकल्प रखडल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर विद्या बालन (vidya balan) हिची इंदिरा गांधींची भूमिका साकारण्याची इच्छाही अपूर्ण राहिली आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता प्रकल्प पुढे ढकलण्याचा निर्णय
माध्यमातील वृत्तानुसार, हा प्रकल्प काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. याचे कारण सध्याची राजकीय परिस्थिती सांगितली जात आहे. यासोबतच कंगना रणौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारणार असल्याचेही बोलले जात आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी कोणत्याही वादात अडकण्याऐवजी प्रकल्प पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

सागरिका घाेष यांच्या पुस्तकावर आधारित मालिका
माध्यमातील वृत्तानुसार, या प्रकल्पावर तीन वर्षांपासून चर्चा सुरू होती. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर ही मालिका बनवली जाणार होती. खरं तर ही मालिका पत्रकार सागरिका घोष यांच्या पुस्तकावर बनवली जात होती. सागरिका घोष यांच्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव ‘मिसेस गांधी’ आहे. विद्या बालन या मालिकेत इंदिरा गांधींची भूमिका साकारणार होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

अरे वाह! हंसिका माेटवानी डिसेंबरमध्ये ‘या’ व्यक्तीसोबत अडकणार लग्न बंधनात
कॅटरिनाने पतीच्या स्टाईलमध्ये केले प्रमोशन, स्टेजवर विकीचे डायलॉग ओरडताना दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा