Tuesday, July 9, 2024

‘आपका हर अंदाज पसंद है सर’, अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर चाहत्याची मन जिंकणारी कमेंट

बॉलिवूडमधील महानायक अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे अमिताभ बच्चन. जरी ते ८० च्या दशकातील असतील तरीही आज ते इतर कलाकारांना टक्कर देतात, मग तो अभिनय असो, डान्स असो किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहणे असो. ते नेहमीच सगळ्यात पुढे असतात. सोशल मीडियावर त्यांचा चांगला वावर असतो. व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांची माहिती ते सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना देत असतात. तसेच ते अनेक मुद्यांवर देखील त्यांचे मत मांडत असतात. अशातच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी काळ्या रंगाचा ब्लेझर सूट घातलेला आहे. डोळ्यांवर चष्मा आणि पायात मिसमॅच हिरव्या रंगाचे शूज घातले आहेत. त्यांचा हा लूक टेलिव्हिजनवरील सर्वात मोठ्या शोपैकी एक असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’मधील आहे. फोटोमध्ये ते केबीसीच्या होस्टच्या खुर्चीत बसलेले दिसत आहेत. (Bollywood actor amitabh bachchan share his photo on social media)

हा फोटो शेअर करून त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “नीचे हरा बूट और उपर मॅचींग सूट.” त्यांच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. या फोटोवर रितेश देशमुखने “सुपर कूल,” अशी कमेंट केली आहे, तर त्यांच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “आपका हर अंदाज पसंद है सर.”

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील एक ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी ‘शोले’, ‘मर्द’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘सुर्यवंशम’, ‘मोहब्बते’, ‘पा’, ‘डॉन’, ‘कूली’, ‘दीवार’, ‘चेहरे’, ‘पिंक’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत गर्लफ्रेंडसोबत करणार हटके लग्न; ‘वेडिंग प्लॅन’बद्दल म्हणाला, ‘आम्ही १०० पाहुण्यांसह स्कायडायव्हिंग…’

-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

-आर्यन खानच्या प्रकरणावर अभिनेत्री तापसी पन्नूची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाली, ‘स्टार फॅमिली असेल तर…’

हे देखील वाचा