Tuesday, January 31, 2023

KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख शुक्रवारी (8 ऑक्टोबर) अमिताभ बच्चन यांच्या रियॅलिटी क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती (केबीसी) 13′ मध्ये विशेष पाहुणे म्हणून आले होते. ‘शानदार शुक्रवार’ या भागात रितेशने त्याच्या लग्नाचे एक मोठे रहस्य उघड केले आहे. रियॅलिटी शोच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यात रितेश आणि जिनिलिया अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेला दिसत आहे. हा आगामी भाग प्रेक्षकांसाठी प्रेम आणि मनोरंजनाने भरलेला असणार आहे.

बिग बींनी दिला होता जिनिलियाचा क्लोजअप शॉट
एपिसोड दरम्यान, या जोडप्याने इंडस्ट्रीमधील त्यांचे अनुभवही शेअर केले आणि जिनिलियाने अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या तिच्या पहिल्या कमर्शियलबद्दल सांगितले. बिग बीं सांगतात की, त्यांनी एकत्र एका जाहिरातीसाठी कसे शूट केले आणि ती त्या वेळची आठवण करून देत म्हणतात, जेव्हा त्यांनी एकत्र शूट केले तेव्हा बिग बींनी जिनिलियाला क्लोज-अप शॉटची विनंती केली होती.

रितेश जिनिलियाच्या लग्नाशी बिग बींचा काय संबंध?
यानंतर, रितेशने आपल्या लग्नाचे श्रेय बिग बींना दिले आणि म्हणाला, “जर तुम्ही त्या दिवशी क्लोज-अप शॉट दिला नसता, तर कदाचित आम्ही लग्न केले नसते. त्या क्लोज-अपमुळे तिने आणि मी आमचा पहिला चित्रपट एकत्र केला. हे सर्व त्या एका क्लोज-अपमुळे झाले आहे.”

जिनिलियाला केले प्रपोज
बिग बींनी रितेशला ‘परफेक्शनिस्ट’ म्हटले. या शोमध्ये रितेशने जिनिलियाला गुडघे टेकून फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले. एवढेच नाही, तर बिग बींच्या चित्रपटाचे डायलॉगही बोलला. ‘कौन बनेगा करोडपती 13’ चा ‘शानदार शुक्रवार’ भाग सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित झाला.

अशी आहे प्रेमकहाणी
रितेश आणि जिनिलिया यांची पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ दरम्यान 2003 मध्ये भेट झाली. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न केले. रितेश आणि जिनिलियाला राहील आणि रियान या दोन नावाची मुले आहेत. (actor riteish deshmukh and genelia dsouza could get married because of amitabh bachchan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुपर बाईक्सचे वेड जॉनला पडले होते चांगलेच महागात, खावी लागली होती जेलची हवा, वाचा किस्सा

‘असा करा सुखी संसार’, रितेश देशमुखने सांगितला जेनलियाबरोबरच्या सुखी संसाराचा फॉर्मुला

हे देखील वाचा