Monday, July 1, 2024

‘आज असे मेळावे क्वचितच पाहायला मिळतात’, म्हणत अमिताभ बच्चन यांनी शेअर केला थ्रो बॅक फोटो

सोशल मीडिया या माध्यमाने आपल्या आयुष्यात प्रवेश केला आणि आपले संपूर्ण आयुष्याचं बदलून गेले. फॅन्स आणि कलाकारांमधील दुवा म्हणून सोशल मीडिया खूप मोठी भूमिका पार पडत आहे. आपल्या आवडत्या कलाकारबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून समजतात. आजच्या काळात तर सोशल मीडियावर कलाकरांना किती लोकप्रियता आहे, किती फॉलोवर्स आहे यावरूनसुद्धा त्यांना सिलेक्ट केले जाते. नवीन, जुने सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यांचे स्टेटस शेअर करताना जुन्या आठवणींना उजाळा देखील देतात.

या सोशल मीडियाची भुरळ महानायक अमिताभ बच्चन यांना देखील पडली आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करताना दिसतात. अनेकदा न पाहिलेले फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना खूश देखील करतात. मागील अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे बिग बी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अलीकडेच, त्यांनी एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार त्यांच्यासोबत दिसत आहेत.

फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, “जितेंद्र, धर्मेंद्र, प्रेम चोप्रा, शत्रुघ्न सिन्हा आणि मोई .. आज असे मेळावे क्वचितच पाहायला मिळतात. ज्यांना देवनागिरीची समस्या आहे, हे त्यांच्यासाठी आहे.” आता अमिताभ यांचा हा फोटो पाहून कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येकजण भरभरून प्रतिक्रिया देत आहे. या फोटोत बॉलिवूडचे हे कलाकार खूप तरुण आणि हँडसम दिसत आहेत. यावरून हा अंदाज लावता येईल की, फोटो किती जुना आहे.

यापूर्वीही अमिताभ बच्चन यांनी अनेक जुने फोटो शेअर केले आहेत जे चाहत्यांना प्रचंड आवडले. बिग बी आणि इतर दिग्गज कलाकार सहसा बोलताना दिसतात की, पूर्वीच्या काळी कलाकारांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडत होता आणि बऱ्याचदा असे छान फोटो पार्ट्यांमध्ये काढले जात होते.

 

सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ वे पर्व होस्ट करत आहेत. त्यांच्यासमोर सामान्य व्यक्तींपासून बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार हॉट सीटवर बसले आहेत. यासोबतच कलाकारांशी संबंधित अनेक मजेदार गोष्टीही समोर आल्या आहेत. अलीकडेच फराह खान आणि दीपिका पदुकोण देखील शोमध्ये पोहोचल्या होत्या.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच त्यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अमिताभ सोबत इम्रान हाशमी, रघुवीर यादव आणि अन्नू कपूर सारखे कलाकार सुद्धा या चित्रपटात दिसले होते. मात्र, चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. त्याचबरोबर त्यांचे ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘झुंड’ हे चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सुरभी चंदना आहे तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्स संपत्तीची मालकीण; एका वर्षात कमवते १ कोटी

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा