Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड खबरदार! अमिताभ बच्चन यांच्या परवानगीशिवाय त्यांचा आवाज, नाव किंवा चेहरा वापराल, तर होईल पंचायत

खबरदार! अमिताभ बच्चन यांच्या परवानगीशिवाय त्यांचा आवाज, नाव किंवा चेहरा वापराल, तर होईल पंचायत

दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. 25 नाेव्हेंबर)ला एक अंतरिम आदेश जारी केला, ज्यानुसार, मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या परवानगीशिवाय त्यांचा आवाज, नाव आणि चेहरा यांच्याशी संबंधित कोणत्याही इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीचा वापर करता येणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी टेलीकॉम मिनिस्ट्री संबंधित विभागांना अमिताभ बच्चन यांच्या परवानगीशिवाय वापरण्यात आलेली सामग्री काढून टाकण्यास सांगितले.

न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांच्या संरक्षणाला मंजुरी दिली आहे. अमिताभ बच्चन हे देशातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहेत आणि त्यांचे नाव आणि चेहरा विविध जाहिरातींमध्ये वापरला जात आहे. अनेक वेळा त्यांचा आवाज, चेहरा लोक त्यांच्या परवानगीशिवाय आपल्या व्यवसायाच्या प्रचारासाठी वापरतात, ज्यामुळे बिग बी नाराज आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी आपली समस्या न्यायालयासमोर मांडली.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, चित्रे आणि आवाज वापरण्यावर आक्षेप व्यक्त केल्याने न्यायालयही त्यांच्याशी सहमत असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. कारण, अशा परिस्थितीत त्यांची आणि त्यांच्या प्रतिमेला हानी पोहोचू शकते. जर अभिनेत्याचे नाव, चेहरा किंवा आवाज त्याच्या परवानगीशिवाय वापरला असेल, तर प्रथमदर्शनी केस तयार केली जाते.

यासह न्यायालयाने बिग बींच्या बाजूने निकाल दिला. म्हणजेच आता अमिताभ बच्चन यांच्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो, आवाज किंवा नाव वापरल्यास असे करणारी व्यक्ती कायदेशीर अडचणीत सापडू शकते. बिग बींनी पर्सनॅलिटी राइट्सचा हवाला देत कोर्टात अर्ज दाखल केला होता. पर्सनॅलिटी राइट्सला राइट ऑफ पब्लिसिटी देखील म्हणतात. हा एक कायदा आहे ज्याच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला त्याच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, आवाज आणि चेहरा आर्थिक बाबींमध्ये वापरण्याची परवानगी द्यायची की नाही. (bollywood actor amitabh bachchan voice image cant be used without his permission delhi high court)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मराठी मालिकेतील अल्पवयीन अभिनेत्रीचा विनयभंग, तरुणाला तीन वर्ष कारावासा

अभिनेते विक्रम गोखलेंबाबत मोठी बातमी! ‘लवकरच व्हेंटिलेटर काढणार, ते डोळेही उघडतायेत’, वाचा काय म्हटलेत डॉक्टर…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा