Thursday, June 13, 2024

अमिताभ बच्चन यांनी जयासोबत का केले लग्न? फक्त प्रेमच नाही तर ‘हे’ हाेते मुख्य कारण

छाेट्या पडद्यावरील प्रसिद्ध क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती 14‘ होस्ट करताना अभिनेता अमिताभ बच्चन आजकाल अनेक खुलासे करत आहेत. गेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्याने स्पर्धकांशी संवाद साधताना फिल्मी जगाशी संबंधित अनेक सेलिब्रिटींबद्दल अशा गोष्टी सांगितल्या, ज्या फार कमी लाेकांना माहित आहे. इतकंच नाही तर, पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबतच्या लग्नाच्या अनेक कारणांपैकी एक कारणही त्यांनी उघड केलं.

मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) हे बाॅलिवूडच्या लाेकप्रिय जाेडप्यांपैकी एक आहे. या दोन्ही दिग्गज कलाकारांनी 3 जून 1973ला लग्न केले. पुढच्या वर्षी ते लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा करणार आहे. क्वचितच कोणाला ठाऊक असेल की, जयाच्या कोणत्या वैशिष्ट्याने बिग बींना तिच्याकडे आकर्षित केले होते.

तर झाले असे की, मंगळवारी (15 नाेव्हेंबर)ला प्रियंका महर्षी नावाची स्पर्धक ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या हॉटसीटवर बसली होती, जिचे केस खूप सुंदर आणि लांब आहेत. अमिताभ बच्चन यांनी तिच्या लांब केसांची प्रशंसा करण्यास सुरुवात केली आणि जेव्हा तिला केस दाखवण्यास सांगितले तेव्हा प्रियांकाने तिचे केस पुढे केले आणि सांगितले की, “असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे कोणीही माझ्यासारखे केस मिळवू शकते. मात्र, त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल. मी शोमध्ये येण्यापूर्वी काही केस कापले, नाहीतर माझे केस अधिक लांब होते.” असे प्रियांका हिने सांगितले. यावर अमिताभ म्हणाले की, “आम्ही आमच्या पत्नीशी लग्न केले कारण तिचे केस खूप लांब होते.” हे ऐकताच शाेमध्ये उपस्थितांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची भेट 1971 मध्ये ‘गुड्डी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. ‘जंजीर’, ‘चुपके चुपके’, ‘शोले’, ‘अभिमान’ यासारखे अनेक दमदार चित्रपट त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला दिली. (tv amitabh bachchan reveals at kbc 14 he tied the knot with jaya bachchan because of her long hair)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! संगीतकार किशोर ब्रिज दुबे यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू, बाथरुममध्ये सापडला मृतदेह

जाळ अन् धूर संगटच! ऐश्वर्याला लेकीला किस करणे पडले महागात, युजर्सने केले ट्राेल

हे देखील वाचा